महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
महापालिका निवडणूक पुन्हा लांबणार
वाशी ः सवाेच्च न्यायालयाने राजकीय ओबीसी आरक्षण फेटाळून लावत पुढील आदेश येईपर्यत ओबीसी आरक्षणासह निवडणूक होणार नाहीत असा आदेश दिला आहे. तर ओबीसी आरक्षण खेरीज निवडणूक होणार नाही, असा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाने घतल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका लांबणीवर पडणार आहेत. याचा सर्वाधिक फटका नवी मुंबईतील इच्छुक उमेद्वारांना बसणार आहे.
२०२० मध्ये नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार होती. त्यासाठी प्रभाग आरक्षण देखील पडले होते. मात्र, कोविड महामारी आल्याने नवी मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्यात आली. आता नवी मुंबई महापालिका निवडणूक बहुसदस्यीय पध्दतीने होणार आहे. आणि त्यासाठी सर्वच इच्छुक उमेद्वारांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र, सुप्रीम कोर्टात राजकीय आरक्षण बाबत निर्णय झाला असून, न्यायालयाने राजकीय आरक्षण फेटाळले आहे. पुढील आदेश येत नाही तोवर ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नाहीत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या आदेशानंतर राज्य मंत्रीमंडळाची तातडीची बैठक पार पडली असून, या बठकीत ओबीसी आरक्षण खेरीज निवडणुका होणार नाहीत, असा निर्णय घण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम राहिल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी केलेल्या तयारीवर पाणी फेरणार आहे.