महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
मराठी राजभाषा दिन निमित्त ‘मनसे’ तर्फे शिक्षकांचा सत्कार
खारघर ः मराठी राजभाषा दिन निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे रोहिंजन, तुर्भे, पिसार्वे धरणा कॅम्प येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’चे उपाध्यक्ष प्रवीण दळवी, पदाधिकारी समीर कानसे, विकास शिंदे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सागर खोत, उमेश सोडकर, शैलेश सोडकर, नंदू शिंदे, नरेश नाईक, कृष्णा हिंगे, सुदर्शन भोसले, संकेत ढोबळे, सुमित ढोबळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात शिक्षिका मीना वाघ, शिक्षक रविंद्र तांडेल, अरुण मोरे, योगेश सुर्वे, लालसाहेब मोरे, यशवंत भगत, शिवाजी शिंदे, गणेश पाटील, विलास काकर, अरविंद काटकर, वामन मदने, सुरेश लोहार यांचा सत्कार करण्यात आला.
खरे विद्यार्थी प्राथमिक शाळेत घडतात. आज कितीही खाजगी शाळा सुरु झाल्या असल्या तरी खेडेगावातील मुले कणखर असतात.आई-वडील मुलांना जन्म देतात. मात्र, मुले-मुलींवर खरे संस्कार शाळेत होतात. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा टिकवून ठेवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे, असे मनोगत यावेळी प्रवीण पाटील यांनी व्यक्त केले.