अनधिकृत झोपड्यांवरील कारवाई ठरली औक घटकेची

नवी मुंबई-:कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेरील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत झोपड्यांचे बस्तान होते. यावर मनपाने स्वतःच्या खर्चाने पोलिसांच्या फौजफाट्यासह कारवाई केली होती. मात्र सदर कारवाई ही औक घटकेची ठरली असून झोपडपट्टी धारकांनी पुन्हा आपले बस्तान रस्त्यावर आणि रेल्वे रुळालगतच्या जागेवर मांडले आहे. त्यामुळे मनपाने केलेला कारवाईचा आटापीटा हा केवळ भुखंडधारकांसाठीच होता का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेरील लगत सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र सदर भुखंडांची सिडकोने विक्री केल्याने आता त्या भागात बांधकामे सुरू आहेत. याआधी ही सिडको आणि मनपाच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली होती. आणि त्यावेळी झोपडपट्टी धारकांनी केलेल्या दगडफेकीत कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजीराव औटी हे जखमी झाले होते. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी झोपडपट्टी उभी राहिली. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी नवी मुंबई महानगर पालिकेच्यावतीने पुन्हा एकदा पोलीसांच्या मोठ्या फौजफाट्यासह या ठिकाणी कारवाई करण्यात आली आणि भुखंड आणि विस्तार रस्ता मोकळा करण्यात आला. मात्र सदर कारवाई ही औक घटकेची ठरत असुन येथील झोपडपट्टी धारकांनी आपले बस्तान पुन्हा एकदा रस्त्यावर आणि रेल्वे रुळालागत मांडले आहे. आणि याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्या नंतर प्रशासन कारवाईचा बडगा उगारते. मात्र तोपर्यंत झोपड्यांचे साम्राज्य आणखीन वाढलेले असते.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पामबीच मार्गावर अक्षर चौकात बीएमडब्ल्यू कारला अपघात