समीर वानखेडे यांच्या नावावर असलेला बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द

नवी मुंबई : एनसीबीचे तत्कालीन पश्चिम विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी त्यांच्या मालकीच्या एपीएमसी ट्रक टर्मिनल वाशी येथील मे. हॉटेल सद्गुरु या आस्थापनेला दारु पीचा परवाना (एफएल-3 अनुज्ञफ्ती) प्राफ्त करताना वयाबाबत असलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचे तसेच त्यावेळी सज्ञान असल्याबाबत सादर केलेली प्रतिज्ञापत्रे खोटी असल्याचे स्पष्ट झाल्याने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी हॉटेल सद्गुरु आस्थापनेला मद्य पीकरिता दिलेला परवाना (अनुज्ञफ्ती) मंगळवारी कायमस्वरुपी रद्द केला आहे.   

एनसीबीचे तत्कालीन पश्चिम विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर खंडणीखोरी व नोकरी मिळवण्यासाठी बनावट जातप्रमाणपत्र बनवल्याचा एकीकडे आरोप असताना त्यांच्या नावावर नवी मुंबईत वाशी येथे बार अँड रेस्टॉरंन्टचा परवाना असल्याची बाब गत नोव्हेंबर महिन्यात समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ज्यावेळी त्यांनी मद्य पीचा परवाना प्राफ्त केला होता, त्यावेळेस त्यांचे वय कमी असल्याचे आरोप झाले होते.  

सदर आरोपाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क, ठाणे कार्यालयात समीर वानखेडे यांना देण्यात आलेल्या मद्य पीच्या परवान्याची चौकशी सुरु होती. यासंदर्भात सर्व साक्षी, जबाब व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपले आरोपपत्र जिल्हाधिकारी ठाणे यांना 29 नोव्हेंबर 2021 रोजी सादर केले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी ठाणे यांनी अनुज्ञफ्ती धारकास 14 डिसेंबर 2021 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सदर नोटीसीस अनुज्ञप्ती धारकाचे स्पष्टीकरण व त्यांनी 21 डिसेंबर, 30 डिसेंबर आणि 4 जानेवारी 2022 रोजी झालेल्या सुनावणी वेळी आपले म्हणणे सादर केले. 

अखेर यासंदर्भात सादर केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर जिल्हाधिकारी ठाणे यांनी सदर परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय 1 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर केला. अनुज्ञफ्ती मंजुरीसाठी समीर वानखेडे यांनी 13 फेब्रुवारी 1997 रोजी जो अर्ज केला होता, त्यावेळी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यामध्ये अनेक त्रुटी जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आल्या आहेत.  

सदर जागेत बार सुरु करता येणार नसल्याचे सिडकोने आपल्या ना हरकत प्रमाणपत्रात स्पष्ट केले होते. 7 जानेवारी 1997 रोजी नोटरी समोर केलेल्या प्रतिज्ञापत्रात समीर वानखेडे यांनी सज्ञान असल्याचे नमूद करताना जाणूनबुजून आपले वय नमूद केले नव्हते. तसेच त्यावेळी आयकर विवरण पत्र सादर करताना परिपुर्ण माहिती दिली नसल्याचेही दिसून आले आहे. मद्य पीचा परवाना प्राफ्त करण्यासाठी त्यांनी मुद्दामहून माहिती दडवल्याचा निष्कर्ष जिल्हाधिकारी यांनी काढला आहे.  

उत्पादन शुल्क विभागाच्या रेकॉर्डनुसार वाशीतील हॉटेल सदगुरूचा परवाना समीर वानखेडे यांच्या नावावर आहे. 27 ऑक्टोबर 1997 साली हा परवाना देण्यात आला होता. आणि नियमानुसार त्याचे नुतनीकरण करण्यात येऊन हा परवाना 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे. बारचा परवाना समीर वानखेडे यांच्या नावावर असून भारत सरकारच्या सेवेत आल्यापासून त्यांनी आपले वडील ज्ञानदेव वानखेडे यांना मुखत्यार पत्र (पॉवर ऑफ ऍटर्नी) दिले आहे. 

दरम्यान, गत नोव्हेंबर महिन्यात समीर वानखेडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना यास दुजोरा देताना आपल्या नावावर बारचा परवाना असणं यात बेकायदेशीर काहीही नसल्याचे म्हटले होते. 2006 साली सरकारी सेवेत येतानाच आपण आपल्या स्थावर मालमत्तेची माहिती दिली आहे, त्यात हे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय या व्यवसायातून येणारा सर्व नफा इन्कम टॅक्स रिटर्नमध्येही दाखवला असल्याचे त्यांनी म्हटले होते.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

खाजगी हौसिंग सोसायट्यांमध्ये राजकीय वर्चस्वाची लढाई