खारघर: गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयाकडून मुंब्रा पनवेल मार्गावरील खारघर येथील शीघ्र कृती दल समोरील चौकात तपासणी नाका पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
तळोजा परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे. खोलगट भागात मातीचा भराव करून इमारतीचे बांधकाम केले जाते. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे. विकासकामांसाठी लागणारे वाळू, दगड, मुरूम, गिट्टी इत्यादी गौण खनिजावर प्रचलित गौण खनिज उत्खनन नियमांच्या तरतुदीनुसार स्वामित्वधन शुल्काची आकारणी करण्यात येते. मात्र तळोजा परिसरात आजही काही भागात अनधिकृत रेती व्यवसाय सुरु आहे. तसेच बांधकामासाठी लागणारे वाळू, दगड, मुरूम, गिट्टी इत्यादी गौण खनिज बांधकाम व्यावसायिक हे परस्पर ठेकेदाराकडून परस्पर विकत घेत असल्याचे दिसून येते. गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मुंब्रा कडून पनवेल,तळोजा आणि खारघर कडे जाणाऱ्या शीघ्र कृती दल समोरील चौकात तपासणी पथकांची स्थापना केली आहे. या पथकात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आले आहे.