खारघरमध्ये तिवरांची कत्तल; गुन्हा दाखल

नवी मुंबई ः खारघर येथील खाडीक्षेत्रात कोळंबी उत्पादन घण्यासाठी जलाशयाची निर्मिती तसेच अनोळखी व्यक्तींकडून कांदळवने नष्ट करण्याच्या विरोधात महसूल अधिकाऱ्यांनी पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत तक्रार नाेंदवली आहे. दरम्यान, याबाबत अधिक वेळ न दवडता सागरी वनस्पतींकरिता वन कवच उपलब्ध करुन देण्याचे हरितप्रेमींनी आवाहन केले आहे.

रेव्हेन्यू सर्कल ऑफिसर पांडुरंग कचरे यांनी खारघर पोलीस स्टेशन येथे नाेंदवलेल्या त्यांच्या पहिल्या एफआरआयमध्ये म्हटले की, वास्तूविहार गृहसंकुलानजिक कांदळवनांची कत्तल झाल्याची बातमी प्रसिध्द झाल्यानंतर महसूल आणि वन अधिकाऱ्यांच्या पथकाने १५ जानेवारी रोजी घटनास्थळी जाऊन तपासणी केली.  

गुगल इमेजवर झटपट नजर फिरवताना लक्षात आले की, २००५-०९ दरम्यान तिवरांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाली आहे. मात्र, कोळंबी पैदास करण्यासाठी बांधण्यात आलेले जलाशय अलिकडेच निर्माण केल्याचे आढळून आले. या संदर्भात महाराष्ट्र पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्यान्वये उलंघन करणारी व्यक्ती दोषी आढळल्यास पाच वर्षांचा कारावास होऊ शकतो. यासंदर्भात करण्यात आलेली कारवाई एक चांगली सुरुवात आहे. पोलिसांनी या प्रकरणी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे आणि आरोपींचा छडा लागला पाहिजे. मैदानाचे सपाटीकरण करण्याकरिता वापरण्यात आलेली वाहने मुख्य पुरावा ठरतात, असे ‘नाटकनेक्ट फाऊंडेशन’चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

कांदळवनांची कत्तल गृहनिर्माण संकुलांकरिता नक्कीच धोकादायक आहे. आम्ही बराच काळ प्रशासनाकडे याविषयी तक्रार करत आहोत. यापूर्वी क्षुल्लक पडताळणी व्यतिरिक्त कोणतीही हालचाल झालेली नव्हती. आता या समस्येची दखल मिडीयाने घऊन ती अधोरेखित केल्याचे खारघर येथील कार्यकर्ते नरेश चंद्र सिंग यांनी सांगितले.

मंत्रालयातून झटपट कारवाईचे निर्देश...
तिवरांच्या कत्तलीच्या वाढत्या तक्रारींचे गांभीर्य ओळखून मंत्रालयातील महसूल आणि वन विभागाने मॅनग्रोव्ह सेल आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे निर्देश दिले. तसेच यासंदर्भात पडताळणी करुन अहवाल सादर करण्यास संबंधितांना सूचित केले आहे. या संबंधीचा ई-मेल नाटकनेक्टला पाठविण्यात आल्याची माहिती बी. एन. कुमार यांनी दिली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 ठेकेदाराकडून स्वीकारली ३० हजाराची लाच ‘सिडको’चा कार्यकारी अभियंता रंगेहाथ जेरबंद