ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी-पालकांतर्फे दिवाळी वस्तू-फराळ प्रदर्शन
जागतिक तापमान वाढ ही मानवनिर्मितच! (५ जून - जागतिक पर्यावरण दिन विशेष)
भविष्यात उत्सर्जन व त्यातून होणारा जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी सर्व जग एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. जर या वर्षापासून सर्वोत्तम संभाव्य पर्याय म्हणजेच शून्य उत्सर्जन शक्य झाले तरी आपली पृथ्वी २०३३ या वर्षापर्यंत थंड झालेली असेल. हरितगृह वायू उत्सर्जन हे सुमारे ५ टक्के कमी करू शकलो, तर सकारात्मक परिणाम दिसण्यास २०४४ पासून सुरू होईल.
मागील दहा पंधरा दिवसात आकाशात ढगाळ वातावरणास महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांत कमी जास्त प्रमाणात पाऊस बरसला होता. अशा या अवकाळी पावसामुळे भर उन्हाळ्यात उन्हाचा पहारा काही अंशी कमी झाला असला तरी घामाच्या धारा कमी होत नाहीत. या वर्षी उन्हाळा लवकर चालू झाला. यामुळे एप्रिल महिन्यात बाहेर फिरणे मुश्किल झाले होते. पण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि उन्हाचा पारा कमी जाणवू लागला. या वर्षी नेमक्या लग्न तिथी जास्त होत्या म्हणून मेमहिन्यात बाजारात तेजी होती. प्रखर उन्हाळ्यातही दुकाने माणसांनी गजबजलेले होते. सिमेंटच्या रस्त्यामुळे वाळवंट झालेल्या महामार्गावर या उन्हाचा त्रास प्रवाशांना फार सहन करावा लागला.
एकुण काय तर, वातावरण माणसाच्या आयुष्यात असंतुलन घडवून आणत आहे. पण खरे तर या सर्वांना कारणीभूत मानवच आहे. माणसाच्या विकसित बुद्धीचा हा परिणाम आहे. याचा परिणाम म्हणजे निर्माण झालेली ही जागतिक तापमान वाढ. ही तापमान वाढ मात्र रोखणे मानवाच्या हातातील बाब राहिलेली नाही. काही उपाय आपल्या वागण्यात अवलंबिली तर आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. एकुण काय तर आपण खोदलेल्या खड्ड्यात आपणच गाडले जाणार हे निश्चित झाले आहे. आज आधुनिकीकरण अत्यंत आवश्यक बाब आहे. पण यासाठी भरमसाठ जंगलतोड होत आहे. समुद्रात भर टाकली जात आहे. गगनचुंबी इमारती बांधल्या जात आहेत. यामुळे शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. वाहतूकीच्या साधनांचा वापर वाढला आहे. यामुळे वातावरण दुषित होत आहे. वातावरणातील धुळीचे साम्राज्य वाढले आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी रिफ्रेजरेटर व ए. सींचा वापर वाढला आहे. यातून बाहेर पडणारी वायू अतिनील किरणे पृथ्वीवर वेगाने आणण्यासाठी मदत करणारे आहेत.
मानवतेसमोरील आव्हानांची यादी केली तर, त्यामध्ये जागतिक तापमान वाढ हे संकट फार वरच्या क्रमांकावर येईल, याबाबत शास्त्रज्ञांच्या मनामध्ये शंका नाही. भविष्यामध्ये वाढलेल्या तापमानामुळे अनेक वनस्पती, सजीव प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. वाढत्या तापमानामुळे ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळून सागरी पातळीत वाढ झाल्याने अनेक बेटे आणि किनाऱ्यावरील भाग पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. सामान्यतः हे तापमान वाढ रोखण्यासाठी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याची कल्पना मांडली जाते. मात्र, हरितगृह ही प्रक्रिया राबवूनदेखील आपली पृथ्वी थंड करण्यास सुरुवात होण्यास काही दशकांचा कालावधी लागू शकतो. वातावरणाचे पॅटर्न (त्याला इंग्रजीमध्ये क्लायमेंट इनर्शिया असे म्हणतात) बदलण्यासाठी अत्यंत खोलवर विश्लेषण करून या हरितगृह वायूंचे कमी करण्याचे नेमके प्रमाण ठरवावे लागणार आहे. हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण वेगवेगळ्या पातळीपर्यंत कमी केल्यानंतर होणारे परिणाम किंवा त्या उत्सर्जनाचे विपरीत परिणाम कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना यांचे उपलब्ध वेगवेगळ्या वातावरणीय प्रारूपांवर या संशोधकांनी काम केले आहे.
जागतिक तापमानवाढीचा सामना करण्यासाठी अक्षय ऊर्जा हे एक शक्तिशाली साधन आहे. पवन, सौर आणि जलविद्युत यांसारखे हे ऊर्जास्त्रोत नैसर्गिक प्रक्रियांमधून मिळतात ज्या सतत भरल्या जातात. कोविड १९ च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी झालेल्या दीर्घ टाळेबंदीच्या काळात कारखाने, वाहतूक संपूर्ण बंद असल्याचे अत्यंत चांगले परिणाम दिसून आले होते. अत्यंत वर्दळीच्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्येही हवेचा दर्जा सुधारल्याचे चित्र दिसून आले होते. म्हणजेच भविष्यात उत्सर्जन व त्यातून होणारा जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी अशाच प्रकारे सर्व जग एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. जर या वर्षापासून सर्वोत्तम संभाव्य पर्याय म्हणजेच शून्य उत्सर्जन शक्य झाले तरी आपली पृथ्वी २०३३ या वर्षापर्यंत थंड झालेली असेल. हरितगृह वायू उत्सर्जन हे सुमारे ५ टक्के कमी करू शकलो, तर सकारात्मक परिणाम दिसण्यास २०४४ पासून सुरू होईल. थोडक्यात तापमानवाढ आपण रोखू शकतो पण त्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रामाणिक प्रयत्न होयाला पाहिजेत. कारण ही समस्या एकट्या आपल्याच देशाची नाही, तर संपूर्ण जगाची आहे.
५ जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. दरवर्षी सरकार, नागरी समाज आणि शैक्षणिक संस्थांमधील लाखो लोक जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणीय समस्यांवर कृतीकरण्यासाठी सहभागी होतात, ज्याचा उद्देश ग्रहाचे भविष्य सुरक्षित करणे आहे. २०२४ ची थीम आपली जमीन, आपले भविष्य ही होती. पर्यावरणात थंडावा आणायचा उत्तमोत्तम मार्ग म्हणजे वृक्ष लागवड वाढली पाहिजे, वृक्ष तोड रोखली गेली पाहिजे. वणवे पेटवून मज्जा पाहणाऱ्या नागरिकांना सजा झाली पाहिजे. या उपाययोजनांसह सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा. - डॉ. श्रीकृष्ण दि. तुपारे