‘अशाने एक दिवस भारत कॅन्सरची कॅपिटल बनण्याची भिती'
नवी मुंबई : भारतात दरवर्षी कॅन्सरच्या १४ लाखांहुन अधिक नवीन केसेस आढळून येत असून हे जर प्रमाण असेच राहिले तर २०२५ पर्यंत त्यांची संख्या १५.७ लाखांवर पोहचेल व भारत कॅन्सरची राजधानी बनण्याची भिती ४ फेब्रूवारीच्या जागतिक कॅन्सर दिनी बेलापूर येथील अपोलो कॅन्सर सेन्टर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात व्यवत करण्यात आली.
भारतामध्ये युवा लोकसंख्येला मोठ्या प्रमाणावर कॅन्सरची लागण होत असल्याची दिसत आहे. कॅन्सरसारख्या रोगाचे लवकर निदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी अपोलो सेन्टर्स कार्यरत असल्याची माहिती यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे नवी मुंबई प्रेसिडेन्ट डॉ. घनश्याम दुलेरा यांनी दिली. कॅन्सरला एक अधिसूचित आजार बनवल्याने राज्यस्तरावर कॅन्सरबद्दलची समजूत आमुलाग्र बदलणार असून ‘युनिफाय टू नोटीफाय' या मोहिमेमध्ये कॅन्सर वर्गीकृत केला जाण्याची मागणी असल्याचे सांगून अपोलो कॅन्सर सेन्टर्सचे देशभरातील जाळे कॅन्सरच्या आकडेवारीचे विश्लेषण करुन कॅन्सरप्रभावित भाग ओळखण्यास त्यामुळे मदत मिळणार असल्याची माहिती अपोलोचे नवी मुंबई संचालक आणि ॲान्कॉलॉजी सिनियर कन्सल्टंट, हेड ॲण्ड नेक ॲान्कॉलॉजी डॉ, अनिल डिक्रूझ यांनी दिली. यावेळी नवी मुंबई युनिट हेड डॉ. किरण शिंगोटे, डॉ. अलका हेही उपस्थित होते.