महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेला नायजेरीयन नागरिक अटकेत
नवी मुंबई : कोकेन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी नेरुळ भागात आलेल्या नायजेरीयन नागरिकाला नेरुळ पोलिसांनी मंगळवारी रात्री सापळा लावून अटक केली आहे. ईफेयांनी उझोमा असोनंडु (५०) असे या नायजेरियन नागरिकाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या जवळ असलेला ३ लाख रुपये किंमतीचे कोकेन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे.
नेरुळ सेक्टर -१ ए भागातील शिवाजी चौक ते राजीव गांधी उड्डाणपूलावर पामबीचकडे जाणाऱ्या रोडवर एक नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती नेरुळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेलार व त्यांच्या पथकाने नेरुळ सेक्टर -१ ए मध्ये मंगळवारी रात्री सापळा लावला होता. यावेळी त्या भागात ईफेयांनी उझोमा असोनंडु हा संशयास्पदरीत्या आला असता, पोलिसांनी या नायजेरीयन नागरिकाला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची तपासणी केली असता, त्याच्याजवळ ३ लाख ,30 हजार रुपये किमतीचे २०.८५ ग्रॅम वजनाचे कोकेन हे अंमली आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी सदरचे अंमली पदार्थ जप्त करुन आरोपी ईफेयांनी उझोमा असोनंडु याला एनडीपीएस कलमाखाली अटक केली. या कारवाईत नायजेरीयन व्यक्तीजवळ असलेली दोन मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहे.