रा. फ.नाईक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयात घर घर तिरंगा, हर घर तिरंगा मोहिमेचा उत्साह

नवी मुंबई : संपूर्ण देशात, घर घर तिरंगा, हर घर तिरंगा ही मोहीम खूप उत्साहात आणि आनंदात चालू असतानाच,  कोपरखैरणे येथील रा. फ.नाईक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालय येथे तिरंगा सप्ताहानिमित्त विद्यार्थी यांची रॅली, ग्रिफीन जिमखानासोबत मॅरेथॉन, विविध सैनिक पालक यांचा तिरंगा देऊन सन्मान, सैनिकांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रथम दिवशी सेवानिवृत्त सैनिक पालक शिवाजी हात्तेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यांनी काश्मीर, कारगिल विजय या मोहिमांमध्ये भाग घेतल्याने त्यांना तिरंगा ध्वज देऊन सन्मानित करण्यात आले.

दुसऱ्या दिवशी विशेष म्हणजे दहावी आणि बारावी मार्च २०२३/२४ च्या परीक्षेत सर्वात सर्वोत्तम गुण संपादन करणाऱ्या पियूष झोडगे या विद्यार्थ्यास ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. या वेळा सैन्यदलात सेवा देणारे अंकुश बढे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ. रेश्मा गावडे आणि आजी माजी विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत माजी विद्यार्थी रूद्राक्ष पातारे यांनी स्वच्छ मुंबईचे गीत तसेच, कवी देवानंद पवार यांची माझा मायेचा उडता पदर माले तिरंगा भासतो ही कविता सादर केली. सातवी वर्गातील प्रसाद माळी या मुलाने ‘दिवाली को पापा क्यू न घर आये आपकी बार' ही कविता सादर करून उपस्थितांना भावविभोर केले. दोन्ही दिवशी निवृत्त सैनिकांनी आपले अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना देश आणि त्याची सेवा याबाबत प्रोत्साहित केले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 केबीपी कॉलेज मधील रोहन तांबडे उत्कृष्ट स्वयंसेवक