महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
केबीपी कॉलेज मधील रोहन तांबडे उत्कृष्ट स्वयंसेवक
नवी मुंबई : रयत शिक्षण संस्था संचालित वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ( केबीपी कॉलेज) मधील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक रोहन रामकिसन तांबडे याचा नुकताच मुंबई विद्यापीठाकडून उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून गौरव करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या कार्यक्षमतेवर आधारित या सन्मानाचा मानकरी म्हणून रोहन तांबडे याची निवड झाली आहे.
जबाबदार स्वयंसेवक असलेला रोहन तांबडे त्याच्यातील नेतृत्वगुणांमुळे आणि समाजकार्याच्या अनन्य साधारण तळमळीमुळे सर्वांमध्ये आदर्श ठरला आहे. उत्कृष्ट कामगिरीमुळे रोहन तांबडे याने राष्ट्रीय एकात्मता शिबीर, नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम आणि ७ दिवसीय रहिवासी शिबिरात महत्वाची भूमिका बजावली आहे. रोहन तांबडे याने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत, मुंबई विद्यापीठ तर्फे त्याला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान केले आहे.
रोहन तांबडे याचा मुंबई विद्यापीठ तर्फे करण्यात आलेला सन्मान केवळ त्याच्या वैयक्तिक यशाचाच नाही, तर महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीच्या आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्षमतेचे प्रतीक म्हणूनही गौरवनीय आहे. त्याच्या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया ‘कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय'च्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी व्यवत केली.
उत्कृष्ट स्वयंसेवक होण्याच्या यशस्वी प्रवासामध्ये रोहन तांबडे याला महाविद्यालयातील एनएसएस प्रकल्प अधिकारी डॉ. लक्ष्मण गवळी, डॉ. प्रणिता भाले आणि प्रा. अमित सुर्वे यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे.