रा. फ. नाईक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयात टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मानवंदना

नवी मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने रा. फ.नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात दोन्ही महामानवांना मानवंदना देण्यात आली. प्रसाद माळी या बालकवीकडून टिळक यांच्यावरील कविता सादर करण्यात आली. मुख्याध्यापक रवींद्र पाटील, उपमुख्याध्यापिका सौ.चारुशीला चौधरी, माजी विद्यार्थी विशाल घाडगे,  राऊत सर, सौ. थळे मॅडम आणि इतर सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यावेळी उपस्थित होते.

८ वी क चा विद्यार्थी कु. ओम सावंत याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची वेशभूषा करून टिळकांबद्दल माहिती आपल्या उस्फुर्त भाषणात सांगितली आणि आज टिळक असते तर ..नक्कीच स्वराज्याचे सुराज्य करण्यास त्यांनी हातभार लावत, देशाला पुन्हा केसरीसारख्या वर्तमानपत्रातून मार्गदर्शन करून एक आदर्श असा समाज निर्माण करण्यास मदत केली असती असा संदेश दिला. शासन उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी विशाल घाडगे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून संस्थेप्रती असलेला आपला स्नेहभाव व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजन सौ.स्वाती भाये व विलास सोनवणे यांनी परिश्रम घेतले.  गोंधळी यांनी आभार मानले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 नवी मुंबईतील शाळा-शाळांमध्ये झळकले स्वच्छता आकाश कंदील