महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नेरुळ महापालिका शाळेतील अंमली पदार्थ व्यसन प्रतिबंध विषयावरील व्याख्यानास चांगला प्रतिसाद
नवी मुंबई : रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई बेसाईड व कॉमन सिटिझन्स असोसिएशन, सेक्टर ४, नेरुळ यांच्या संयुवत विद्यमाने नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १०२, सेक्टर ४ नेरुळ येथे २४ जुलै रोजी अमली पदार्थ व्यसन प्रतिबंध ह्या विषयावर यजुवेंद्र खाजेकर (मास्टर ट्रेनर इन ड्रग अवरनेस) ह्यांचे व्याखान आयोजित करण्यात आले होते. ह्याचा इयत्ता १० वी तील १०० हून अधिक विद्यार्थांनी लाभ घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कारळे ह्यांनी सर्वांचे आभार मानले व असेच कार्यक्रम जास्तीत जास्त शाळेत दर वर्षीं राबवावेत असे यावेळी सुचविले.
ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई बेसाईडचे सेक्रेटरी व कॉमन सिटिंझन्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष हरीश इंगवले ह्यानी विशेष प्रयत्न केले. ह्यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्ष सौ रमा रंगनायकी व इतर रोटरी मेंबर तसेच शिवाजीराव शिंदे, एन आर कुलकर्णी, संतोष भिसे उपस्थित होते.