महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
ठाणे येथील जिजाई बाल मंदिरात पर्यावरणपूरक दिंडी
ठाणे : १६जुलै रोजी जिजाई बाल मंदिर प्राथमिक व मो.कृ.नाखवा हायस्कूल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीची सुरुवात शाळेच्या प्रवेशद्वारावरून करण्यात आली. इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. लहान बालगोपाल (इयत्ता पहिली ते चौथी) वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये दिंडीमध्ये सहभागी झाले होते. काही विद्यार्थी विठ्ठला रखुमाईच्या वेशभूषेत हजर झाले होते.
लहान मुलांनी विविध प्रकारचे अभंग, भक्ती गीतांचे गायन केले. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी टाळ,मृदंग, ढोल ताशा चा उपयोग करून लेझीम सादरीकरण केले. वृक्षभक्तीची दिंडी चेंदणी कोळीवाडा येथे असलेल्या वि्ील रखुमाईच्या मंदिरामध्ये नेण्यात आली, मंदिरामध्ये विविध भक्तीगीते घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. दिंडी परिसरातून जात असताना विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक घोषणा दिल्या. प्राथमिक विभाग मुख्याध्यापक सौ.ऋतुजा रविंद्र गवस, माध्यमिक विभाग मुख्याध्यापक बबन निकुम, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष, समाजसेवक जगन्नाथ केदारे, पालकवर्ग दिंडीस उपस्थित होते.