महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
आषाढी एकादशी निमित्त मुले मुली सजली वारकऱ्यांच्या वेशात
नवी मुंबई : कोपरखैरणे येथील ज्ञान विकास प्राथमिक विद्यालय येथे १६ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता १ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी संत, वारकरी, भक्त यांच्या वेशभूषेत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमच्या शाळेचे प्रशासकीय अधिकारी बिडवे सर व मुख्याध्यापक दळवी सर यांनी विठू माऊलीच्या पालखीचे पूजन केले. सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्या समवेत दिंडी मिरवणूक सोहळा पार पडला. इयत्ता ५वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत खूप सुंदर अभंग सादर करण्यात आले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आयोजन सौ मनिषा पाटील व अनिल चौधरी यांनी केले.