महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
मॉडर्न स्कुलमध्ये आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा
वाशी : टाळ मृदूंगाच्या गजरात मॉडर्न स्कुलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा साजरा करण्यात आला.
आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव या दिवशी साजरा केला जातो.वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. त्याचाच एक भाग म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील मॉडर्न स्कुल मध्ये वारकरी दिंडी काढून आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
विदयार्थ्यांनी वारकरी वेष धारण करून विठ्ठल - रखुमाईची पालखी विद्यालयाच्या आवारात फिरविली. यावेळी विदयार्थ्यांनी भारूड, भजन, अभंग सादर केले. पंढरपूर येथे वारकऱ्यांचे रिंगण असते तसेच रिंगण छोट्या वारकर्यांनी तयार करून पंढरपूरचा साक्षात्कार दिला. या आषाढी एकादशीच्या सोहळ्यास विद्यालयाच्या प्राचार्या सुमित्रा भोसले, पर्यवेक्षक आबासाहेब वाघ, मनीषा सकपाळ, हना सरेला, शिक्षक व मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे विदयार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.