महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
सोशल मिडियाच्या आहारी न जाण्याचा सल्ला
नवी मुंबई : नेरुळ येथील पुणे विद्यार्थी गृहाच्या विद्याभवन शिक्षण संकुलात १० जुलै रोजी जागरूक नवी मुंबईकर अभियान अंतर्गत सायबर क्राईम आणि सेक्युरिटी एक्स्पर्ट विशेष पोलीस अधिकारी डॉ. विशाल माने यांनी सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून सायबर सुरक्षा, व्यसनधिनता आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडण्यासाठी आवश्यक गोष्टींची सविस्तर माहिती दिली.
सोशल मीडियाच्या खूप आहारी जाणे टाळले पाहिजे. बहुतेक गुन्ह्यांची सुरुवात तिथे होते. अमली पदार्थ सेवन करणे, बाळगणे, पुरवणे, विकणे हेदेखील गुन्हे असतात असे स्पष्ट सांगत व्यायाम करा, शिक्षण ध्येय ठेवा, व्यसनी व्यक्तीपासून दूर रहा, आई वडील आणि शिक्षकांना आदर्श माना असा मौलिक सल्ला डॉ विशाल माने यांनी दिला. या कार्यक्रमास पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे कुलसचिव दिनेश मिसाळ, मुख्याध्यापक गोरख कदम, मुध्याध्यापिका सुवर्णा मिसाळ, श्रीजा नायर, समन्वयक पांडुरंग मुळीक तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमास उपस्थित होते.