दिव्यांग बांधवांचा दिव्यांगाला मदतीचा हात

उरण : सारडे गावातील राजेश धनाजी ठाकूर या गरीब दिव्यांग बांधवाला व्ॉÀन्सरने ग्रासले असून त्याला आधार देण्यासाठी तसेच आर्थिक मदत देण्यासाठी उरण तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांनी आपला मदतीचा हात पुढे करत राजेश ठाकूर यांच्या कुटुंबाकडे आर्थिक मदत सुपूर्द केली आहे.

सारडे गावात राहणारा राजेश ठाकूर गरीब कुटुंबातील मुक-बधिर दिव्यांग मुलगा कुठेही मिळेल तिथे अंगमेहनतीचे काम करायचा. काही दिवसांपूर्वी तो आजारी पडला. त्याची शारीरिक तपासणी केली असता त्याला हाडाचा व्ॉÀन्सर झाल्याचे निदान झाले. व्ॉÀन्सरवर औषधे चालू केली; पण आताच्या घडीला दोन-दोन दिवसांनी त्याला डायलेसिस करण्यासाठी खारघर येथे हॉस्पिटल मध्ये घ्ोऊन जावे लागते. राजेश ठाकूर याची सत्यपरिस्थिती माहिती होताच उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी माणुसकीच्या भावनेतून आधार देत राजेश ठाकूर याला मदतीचा हात पुढे केला आहे. दिव्यांग बांधवांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Read Previous

क्लाऊड नाईन रुग्णालयाला महापालिकेची नोटीस