श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल तर्फे "गिफ्ट ऑफ लाइफ" अंतर्गत 30 हजार मोफत बालहृदय शस्त्रक्रिया

नवी मुंबई :  महाराष्ट्रातील मुंबई; छत्तीसगडमधील रायपूर आणि हरियाणातील पलवल येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल्सने “गिफ्ट ऑफ लाइफ” या कार्यक्रमांतर्गत 30 हजार मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि उपचार यशस्वीपणे पूर्ण केल्याचा आनंद साजरा केला. खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. सी. श्रीनिवास आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तसेच रुग्णालयाचे विश्वस्त सुनील गावस्कर यांनी त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलच्या वतीने  बालकांच्या 30 हजार मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि तपासण्या पूर्ण करण्यात आल्या. हे कार्य देशभरातील मुलांना अत्यंत आवश्यक असलेली हृदयविकाराची देखभाल उपलब्ध करून देण्याचे रुग्णालयाचे दृढ समर्पण अधोरेखित करणारे आहे. भारतासारख्या देशात लहान मुलाचा हृदयविकार ही केवळ त्याच्या उपचारांशी संबंधित समस्या नसून तो त्याच्या कुटुंबासाठी आर्थिक भारही आहे आणि अशा परिस्थितीत रुग्णालयाच्या या प्रयत्नांमध्ये एक नवी आशा आणि माणुसकीची झलक दिसून येते.

श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलने श्री सत्य साई संजीवनी हेल्थकेअर स्किल्स डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट येथे भारतातील पहिला मोफत आरोग्य सेवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे, जिथे इयत्ता 10वी किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचा कार्यक्रम दिला जातो आणि त्याच्या निधीची व्यवस्था देखील संस्थेद्वारे केली जाते. हा कार्यक्रम आरोग्य सेवा क्षेत्रातील वैद्यकीय आणि सर्जिकल सहाय्यकांसह कुशल आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या मागणीवर लक्ष केंद्रित करतो, विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षणाव्यतिरिक्त कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व विकास प्रदान करतो.

महान क्रिकेटपटू आणि श्री सत्य साई हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त, सुनील गावस्कर, यांनी श्री सत्य साई संजीवनी येथे शेकडो हृदय शस्त्रक्रिया प्रायोजित केल्या आहेत. ते या उद्देशाचे ब्रँड अँम्बेसेडर आहेत. येथे येणाऱ्या गरजवंतांसाठी ते आशेचा किरण ठरले आहेत. समाजहिताच्या कार्याबद्दल बोलताना ते म्हणाले, " श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात केलेल्या या पूर्णपणे मोफत शस्त्रक्रियांद्वारे या मुलांना नवीन निरोगी भविष्य मिळत असल्याने मी याला माझ्या आयुष्यातील तिसरा आणि सर्वात समाधानकारक टप्पा मानतो. ही मुले भविष्यातील यशस्वी खेळाडू/महिला खेळाडू, कलाकार किंवा जागतिक नेतृत्व बनू शकतात. या परिवर्तनात्मक प्रवासाचा भाग होण्यासाठी मी सर्वांना आवाहन करेन.

Read Previous

क्लाऊड नाईन रुग्णालयाला महापालिकेची नोटीस

Read Next

उष्णतेच्या लाटेने लहान मुलांमध्ये डिहायड्रेशनचा धोका