अंबानी हॉस्पिटलने पलावामध्ये नवे मेडिकल सेंटर सुरु

नवी मुंबई : कोपरखैरणे मधील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलने पलावामध्ये नवे मेडिकल सेंटर सुरु केले आहे. त्यामुळे आता पलावा मधील तसेच जवळपासच्या भागातील नागरिकांना हॉस्पिटलच्या अत्याधुनिक वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येईल, कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आरोग्यविषयक गरजा याठिकाणी पूर्ण होतील.

सदर मेडिकल सेंटरमध्ये फॅमिली फिजिशियन्स आणि सुपर-स्पेशलिस्टस्‌ उपलब्ध होतील. त्यामुळे आरोग्यसेवेशी संबंधित सर्व गरजा तातडीने पूर्ण होऊ शकतील. पुरेपुर लक्ष पुरवले जाईल आणि सर्वोत्तम वैद्यकीय कौशल्यांचा लाभ याठिकाणी घेता येईल. नियमित तपासण्या आणि निवारक देखभाली पासून गंभीर स्थिती आणि वैद्यकीय आणीबाणीचे व्यवस्थापन करण्यापर्यंत प्रत्येक रुग्णाला सदर मेडिकल सेंटरमध्ये सर्वसमावेशक वैयक्तिक देखभाल पुरवली जाईल.

या मेडिकल सेंटरमध्ये अनेक वेगवेगळ्या सेवा उपलब्ध आहेत. सर्व वयोगातील व्यक्तींसाठी सर्वसमावेशक देखभाल येथे पुरवली जाईल. प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सर्वांगीण कल्याणावर भर दिला जाईल. मेडिकल सेंटर मध्ये कार्डिओलॉजी, न्यूरॉलॉजी, ऑर्थोपेडिक्स, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि इतर स्पेशालिटीजचे तज्ञ प्रत्यक्ष किंवा टेलिकन्सल्टेशन मार्फत भेटू शकतील. अतिशय अचुक निदान तातडीने केले जावे, यासाठी सुविधाजनक ऑन-साईट लॅबोरेटरी सेवा पुरवल्या जातील.

ज्यामध्ये तातडीने उपचारांची गरज भासते अशा गंभीर आणीबाणीच्या प्रसंगी, मेडिकल सेंटरमधील वैद्यकीय टीम तत्परतेने सक्षम देखभाल पुरवेल. प्रत्येक रुग्णाला आवश्यक असलेली देखभाल जराही उशीर न होता मिळावी यासाठी हॉस्पिटलने विशेष रुग्णवाहिका सेवा देखील तैनात केल्या आहेत.

पलावा आणि आजुबाजुच्या भागातील नागरिकांसाठी आमच्या सेवा उपलब्ध करुन देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. मेडिकल सेंटर सर्वोत्तम दर्जाच्या आरोग्यसेवा सर्वांना उपलब्ध करुन देणार आहे. अनुभवी डॉक्टरांची आमची टीम आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांची उपलब्धता यामुळे नागरिकांना सर्वोत्तम संभव देखभाल त्यांच्या घराच्या अगदी जवळ उपलब्ध होऊ शकेल, असे कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलचे संचालक डॉ. बिपीन चेवले यांनी सांगितले.

Read Previous

क्लाऊड नाईन रुग्णालयाला महापालिकेची नोटीस

Read Next

सीबीडी पोलीस ठाणे येथे ओपन जिम सुविधा