डोंबिवली औद्योगिक विभागातील नाल्यात निळे पाणी

 डोंबिवली :  डोंबिवली पूर्वेकडील औद्योगिक विभागातील मंगळवा २ तारखेला एका नाल्यात निळे पाणी साचल्याने त्यात केमिकल असल्याचा आरोप  मनसेने केला आहे. मात्र नाल्यातील पाण्यात केमिकल नसून परिसरातील रंगाचे पाणी असल्याचे कामा संघटनेने म्हटले आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाल्याची पाहणी करू असे सांगितले. या नाल्यातील पाण्याची चर्चा सुरु असताना नाल्यात आलेले निळे पाणी नक्की कुठून आल्याची माहिती नियंत्रण मंडळाकडून मिळणार आहे.

 औद्योगिक विभागातील नाल्यात निळे रंगाचे केमिकल युक्त पाणी असून ते पाणी कंपनीकडून सोडण्यात आल्याचा आरोप मनसेचे विभागप्रमुख संजय चव्हाण यांनी केला आहे. या परिस्थितीवर प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळ्यावर झापडे लावून बसले आहे. एमआयडीसीला रहीवाशांना कोणीच वाली नाही का ? यापुढे असेच केमिकल युक्त पाणी नाल्यात दिसल्यास मनसेकडून आंदोलन केले जाईल असे चव्हाण यांनी सांगितले.तर कामा संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ.देवेन सोनी यांना विचारले असते ते म्हणाले,या नाल्यातील निळे पाणी म्हणजे केमिकल नाही.कंपनीकडून नाल्यात केमिकल सोडले जात नाही. कंपनीत याची यंत्रणा असून याला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी करण्यात आली आहे.

     यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले, डोंबिवली औद्योगिक विभागातील पाईपलाईन किंवा चेंबर लिक असतील तर नाल्यात रंगाचे पाणी साचू शकते. येथील कंपन्यातुन केमिकल नाल्यात सोडले जात नाही. नाल्यात निळ्या रंगाचे पाणी असल्यास पाहणी करू.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 गुटख्याच्या पुडीमुळे मुकबधीर मुलाच्या हत्येचा छडा