ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ सेवन दुष्परिणामाबाबत कार्यशाळा 

ठाणे : ठाण्यात अंमली पदार्थाचे सेवन आणि प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत चालला असतानाच ठाणे पोलिसांनी कठोर कारवाई करीत जनजागृती अभियान सुरु केले आहे. सदरचे अभियान हे शाळा, कॉलेज, खाजगी क्लासेस मध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये जनजागृती मोहीम सुरु केली. अंमली पदार्थाचे दुष्परिणाम याची कल्पना शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना असावी यासाठी ठाणे पोलिसांच्या वतीने बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास श्री रघुवंशी लोहाना समाज हॉल, महाजनवाडी, खारकर आळी, महागिरी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेसाठी ठाणे पोलीस दलाचे सह आयुक्त दत्तात्रय कराळे,पोलीस उपायुक्त गणेश गावडे,  वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड, यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

ठाण्याच्या श्री रघुवंशी लोहाना समाज हॉल, महाजनवाडी खारकर आळी महागिरी येथे आयोजित अंमली पदार्थाचे दुष्परीणाम विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच अंमली पदार्थ विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये ठाणे शहरातील विविध शाळा, कॉलेज विद्यार्थी आणि प्राचार्य आणि शाळेचे मुख्याध्यापक, खाजगी क्लासेसचे संचालक आणि अनेक एनजीओ यांनी सहभाग घेतला. यावेळी कार्यशाळेत जमलेल्या मुख्याध्यापक, प्राचार्य आणि विद्यार्थी, पालक यांनी शाळेच्या आसपासच्या परिसरातील पानाच्या टपऱ्यावर हा सगळा कारभार चालतो. त्या टपऱ्यांचा बंदोबस्त करावा असा सूर कार्यशाळेत निघाला. तर शाळेचे मुख्याध्यापक आणि क्लासेस संचालक यांनी मात्र जी उनाड मुले आहेत. ती शाळेच्या बाहेर हा कार्यभार उरकतात आणि शाळेत आल्यानंतर इतर विद्यार्थ्यांना बिघडविण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. या कार्यशाळेत सह आयुक्त दत्तात्रय कारले यांनी सांगितले कि, अंमली पदार्थाचे गंभीर दुष्परिणाम आहेत. यापासून तरुण पिढी जी देशाचे भविष्य आहे ही विळख्यात अडकता कामा  नये, ठाणे पोलीस दल हे कसोशीने प्रयत्न करीत आहोत. कठोर कारवाईची माहीम राबविण्यात येत आहे. मुलांकडे आम्ही किंवा तुम्ही लक्ष देण्याची  जबाबदारी निश्चित नाही. तर तुम्ही आणि आम्ही संयुक्तपणे लक्ष देऊन मुलांना या जीवघेण्या व्यवसानापासून दूर ठेवण्याचा पर्यटन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

१.९० कोटींचे सोने घेऊन मुंबईतील ज्वेलर्स फरार