रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत तुर्भे वाहतूक शाखेकडुन वाहन चालकांमध्ये जनजागृती  

नवी मुंबई : रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत तुर्भे वाहतुक शाखेच्या वतीने मंगळवारी वाहन चालकांमध्ये वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे, पोलीस उपनिरीक्षक महाडेश्वर, बीएएसएफ कंपनीचे प्रशासकीय अधिकारी गुफ्ता, रिक्षा युनिटन संघटनेचे अध्यक्ष दिलीप आमले, सानपाडा रिक्षा युनियन संघटेनेचे अध्यक्ष संतोष जाधव, समाजसेवक दळवी आदींसह शेकडो वाहनचालक उपस्थित होते.  

नागरिक तसेच वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमाबाबत जनजागृती व्हावी याकरिता रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत नवी मुंबई पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत. तुर्भे वाहतूक शाखेच्या वतीने देखील या उपक्रमांतर्गत वाहन चालक तसेच नागरिकांमध्ये वाहतूकीच्या नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी शाळा, कॉजेलमध्ये वाहतूकीवर आधारित चित्रकला, निबंध, वकृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, मोक्याच्या ठिकाणी पथनाटÎ, विद्यार्थ्यांची रॅली व बाईक रॅलीद्वारे वाहतूक नियम आणि वाहतूक सुरक्षेविषयी टेम्पो, टॅक्सी, टँकर, रिक्षा, खाजगी बसेस चालविणाऱया वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.  

या उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत तुर्भे वाहतुक शाखेच्या वतीने मंगळवारी वाहनचालकांमध्ये वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी वाहनचालक तसेच नागरिकांना वाहतूक सुरक्षा व आणि नियमांची माहिती मिळावी या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. तसेच अती घाई संकटात ने ही या घोष वाक्यानुसार अपघातांना आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्रित येवून रस्ता सुरक्षेविषयी जागरुक राहणे गरजेचे असल्याचे तसेच वाहतूकीचे नियमांबाबत माहिती घेवून त्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे धरणे यांनी यावेळी सांगितले.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाहतुक नियमांबाबत शालेय विद्यार्थी व कॉर्पोरेट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती