वाहन चालकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे - पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ

उरण : जेएनपीए बंदर परिसरात सध्या वाहन चालकांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. तरी वाहन चालकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता आणि आपल्या मनातील भिंती, गैरसमज बाजूला ठेवून पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी ट्रानस्फोटर संघटनेचे पदाधिकारी व वाहन चालकांना केले आहे.

देश-परदेशात मोठ्या प्रमाणात मालाची आयात-निर्यात ही जेएनपीए बंदरातून होत आहे. त्यामुळे या बंदरातील रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची रेलचेल असते. मात्र दोन दिवसा पासून सदर वाहन चालकांना भयभीत करणाऱ्या अफवा या पसरवल्या जात आहेत. तसेच शासनाच्या हिट अँड रनच्या कायद्यामुळे धास्तावलेल्या काही वाहन चालकांनी आपल्या गैरसमजूतीन रस्त्यावर उतरून कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे.या सर्व घटनेचे गांभीर्य ओळखून नवीमुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी जेएनपीए बंदर परिसरातील ट्रानस्फोटर, ट्रक व चालक संघटनेचे पदाधिकारी व वाहन चालकांबरोबर संयुक्त बैठकीचे आयोजन पोलीस ठाण्यात मंगळवारी ( दि२) केले होते.यावेळी पोलीस व उपस्थित ६० पदाधिकाऱ्यां समवेत सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले की हिट अँड रन कायद्यामुळे सध्या वाहन चालकांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत.तरी हे गैरसमज बाजूला ठेवून शासनाला, पोलीस यंत्रणेला वाहन चालकांनी सहकार्य करावे.कारण हा कायदा मूळात अपघात होऊ नये,तसेच अपघात झाला तर त्या अपघातग्रस्त नागरीकांना प्रथम माणूस म्हणून सहकार्य करावे.तसेच पोलीसांना तात्काळ ११२ या नंबर माहित उपलब्ध करून देण्यासाठी पारीत करण्यात आला असून जो कोणी अपघातग्रस्त वाहन चालक  पळून जात असेल तर ते योग्य नाही.आणि अपघाताच्या ठिकाणाहून पळून जाणे म्हणजे हिट अँड रन समजले जाते.तरी वाहन चालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कायद्याचा आदर करावा असे आवाहन शेवटी पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी ट्रानस्फोटर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व वाहन चालकांना केले आहे.यावेळी ट्रानस्फोटर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ठाणे पोलिसांच्या रेजींग डे मध्ये विद्यार्थ्याचे प्रबोधन