बेलापूर शाळेतील आंतरशालेय समुह नृत्य स्पर्धेत अनेक शाळांचा उत्स्फूर्त सहभाग

विद्या उत्कर्ष मंडळाच्या प्राथमिक विद्यामंदिराचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई : बेलापूर येथील विद्याउत्कर्ष मंडळ या शैक्षणिक संकुलात गत शुक्रवारी पार पडलेल्या नवी मुंबई आंतरशालेय समुह नृत्य स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम विद्यादीप कोपरखैरणे, द्वितीय विद्याभवन नेरुळ तृतीय प्राथमिक विद्यामंदिर बेलापूर, उत्तेजनार्थ न्यू बॉम्बे स्कूल घणसोली व माध्यमिक गटात प्रथम क्रमांक विद्याभवन नेरुळ, द्वितीय न्यू बॉम्बे सिटी स्कूल घणसोली, तृतीय विद्याप्रसारक हायस्कूल बेलापूर, उत्तेजनार्थ शिक्षण प्रसारक नेरुळ या शाळांनी पटकावला.

बेलापूर येथील विद्याउत्कर्ष मंडळ या शैक्षणिक संकुलात गत शुक्रवारी नवी मुंबई आंतरशालेय समुह नृत्य स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे हे 8 वे वर्ष होते. सदरच्या स्पर्धेत नवी मुबंई क्षेत्रातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील सर्व विजेत्या गटाला आकर्षक चषक प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आले. 

दरम्यान, शनिवारी बेलापूर येथील विद्या उत्कर्ष मंडळाच्या प्राथमिक विद्यामंदिराचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष्य पंढरीनाथ पाटील, अध्यक्ष भालचंद्र कोळी, मुख्याध्यापिका मोहिनी भालेकर, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्रद्धा संदानशिव तसेच विद्यार्थी, पालक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

१४ जानेवारी रोजी ‘नमो' खारघर मॅरेथॉन