पोदीच्या महानगरपालिका शाळेमध्ये कोलाज काम व  टाकाऊ वस्तुंपासून टिकाऊ वस्तू स्पर्धा

पनवेलमध्ये ‘कोलाज काम व टाकाऊ वस्तुंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे ’ स्पर्धा  १९ डिसेंबर २०२३ रोजी  संपन्न

पनवेल :  पनवेल महानगरपालिकेच्या दहा शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संपुर्ण विकासाच्या दृष्टीने सातत्याने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ०८ पोदी येथे ‘ कोलाज काम व टाकाऊ वस्तुंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे ’ स्पर्धा मंगळवार दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. या आंतरशालेय स्पर्धेत महापालिकेच्या दहा शाळा सहभागी झाल्या होत्या.

 ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. कचऱ्याचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या रोखण्यासाठी शालेयस्तरावरती विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने ही स्पर्धा घेण्यात आली. आपल्या शाळेमध्ये, घरांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी टाकाऊतून टिकाऊ हा पर्याय अधिक कल्पक व कचरा मुक्तीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल असू शकते. त्यामुळे कचऱ्यात जाणाऱ्या अनेक वस्तूंचा पुनर्वापर होऊ शकतो हे या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजले.

ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. पहिला गटात इयत्ता दुसरी व तिसरी , दुसऱ्या गटात चौथी व पाचवी आणि तिसऱ्या गटात सहावी व सातवीचा समावेश होता. पहिल्या व दुसऱ्या गटांना `कोलाज काम `हा विषय होता, तर तिसऱ्या गटाला टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे हा विषय होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतील खराब झालेल्या वस्तूंपासून वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य तयार केले. यामध्ये कागद, करवंट्या, तुटलेले पेन ,तुटलेल्या वस्तू ,रद्दीपेपर, खराब बॅगा यांना साफ करून विविध वस्तू तयार केल्या. आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून विद्यार्थ्यांनी विविध वस्तू बनविल्या होत्या. महापालिकेच्या  सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

 अत्यंत उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेतून दोन  शिक्षक उपस्थित होते. ही स्पर्धा अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे , शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी श्रीमती कीर्ती महाजन तसेच पोदी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ .अश्विनी भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

बेलापूर शाळेतील आंतरशालेय समुह नृत्य स्पर्धेत अनेक शाळांचा उत्स्फूर्त सहभाग