गुरुकूल स्कुल ऑलंम्पीक स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे यश

अंडर १४ क्रीकेट सामन्यात दुसरा क्रमांक तर अंडर १४ फुटबॉल स्पर्धेत पहिल्या क्रमांक पारितोषिक पटकावला

पनवेल : पनवेल गुरुकूल स्कुल ऑलंम्पीक २०२३- २४ स्पर्धा नुकतीच संपन्न झाली असून या स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कामगिरी करून यश प्राप्त केले आहे.

शांतिनिकेतन शाळेतील मुलांनी पूनम पवार आणि मुख्याध्यापिका डॉ. सीमा पैकर यांच्या उत्तम मार्गदर्शना खाली नुकत्याच पार पडलेल्या गुरुकूल स्कुल ऑलंम्पीक २०२३-२४ च्या स्पर्धात विविध बक्षिसे मिळवली आहेत. अंडर १४ क्रीकेट सामन्यामध्ये त्यांनी दुस-या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. अंडर १४ फुटबॉल संघाने पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. इयत्ता आठवी A  मधील आदिल नायरला सामना वीर घोषित करण्यात आले आहे. अंडर 14 च्या 100 मी. आणि 200 मीटर रनीग स्पर्ध्य मध्ये दुस-या क्रमांकाचे रजत पारितोषीक मिळविले आहे. पनवेल महानगरपालिका आयोजित DSO TAEKWANDO  स्पर्धेमध्ये चैंपियन ट्रॉफि पटकावली आहे. शांतिनिकेतन पब्लीक स्कुल पनवेल येथील विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हयामध्ये सर्वाधिक पदके पटकावली आहेत.त्याबद्दल या विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.            

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाची सांगता