रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाची सांगता 

पराभव पचविण्याची क्षमता आणि विजयाचा उन्माद न करणे हे दोन्ही गुण खेळातून शिकायला मिळतात - आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू संजय कडू

नवी मुंबई : पराभव पचविण्याची क्षमता आणि विजयाचा उन्माद न करणे हे दोन्ही गुण खेळातून शिकायला मिळतात, असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू संजय कडू यांनी केलं.

रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील मॉडर्न स्कूलचा, 44 व्या क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी पार पडला त्यावेळी कडू बोलत होते.

11 डिसेंबर पासून सुरु असलेल्या क्रिडामोहोत्सवाची सांगता शनिवारी 16 डिसेंबर ला झाली. विद्यालयाच्या आवारात पार पडलेल्या या महोत्सवास संजय कडू (आंतर राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू ), दशरथ (  रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा  शाळा समितीचे अध्यक्ष ), मयंक चाफेकर ( पेंटॅथलॉन खेळाडू), प्रशांत म्हात्रे (प्रभारी नवी मुबंई महापालिका शिक्षण विभाग), सुमित्रा भोसले (प्राचार्या, मॉडर्न स्कूल), रविंद्र वाघ (मुख्याध्यापक, मराठी प्राथमिक ), विद्यालयाचे सर्व विभागप्रमुख , क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना गौरविण्यात आले.

खेळाला दुय्यम स्थान न देता प्रथम संधी द्यायला हवी,कारण खेळ तुम्हाला खूप काही शिकवून जातो. - मयंक चाफेकर

सर्वसामान्यांना व्यासपीठ देणारी रयत शिक्षण संस्था ही एकमेव संस्था असून आपण सर्व रयतचे विदयार्थी असल्याचा मला अभिमान वाटतो. - दशरथ भगत

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांची लक्षणीय कामगिरी