महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
विज्ञान व वाणिज्य प्रदर्शनात विद्याभवनचे यश
पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरुळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलाच्या उच्च माध्यमिक विभागाचे विज्ञान आणि वाणिज्य प्रदर्शनात सुयश
नवी मुंबईः पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलाच्या उच्च माध्यमिक विभागाने नवी मुंबईत घेण्यात आलेल्या विज्ञान आणि वाणिज्य प्रदर्शनात तृतीय क्रमांक मिळवत आपले स्थान सिद्ध केले.
ओरीएन्टल एज्युकेशन सोसायटीच्या सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी आयोजित आंतर महाविद्यालयीन कॉमर्स फेस्टिवल २०२३ मध्ये विद्याभवनच्या विद्यार्थ्यांनी रिप्लेसमेंट ऑफ फॉरेन कंपनीज इन इंडिया या विषयावर प्रकल्प सादर केला. शामली सिंग, शिवानी पुजारी आणि साक्षी मिश्रा या विद्यार्थिनींनी या प्रकल्पाचे सादरीकरण केले. अथर्व शिंदे, ओंकार जातेकर, निशा मोहतो आणि विशाखा यादव यांनी या प्रकल्पास मदत केली. या प्रकल्पाने तृतीय क्रमांक पटकावला.
नवी मुंबईत केंद्र स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सोहम वायाळ आणि गिरीश वाबळे या विद्यार्थ्यांनी ट्रान्सपोर्ट अँड टेक्नॉलॉजी या विषयावर विज्ञान प्रकल्प सादर केला. त्यांची तृतीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली. तसेच माध्यमिक इंग्रजी विभागातील विद्यार्थी आर्या नाक्ती आणि आरीज पटवेगर यांनी टेल्सा कॉईल या प्रयोगासाठी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे संचालक दिनेश मिसाळ, मुख्याध्यापिका राजकुमारी इंदलकर, सुवर्णा मिसाळ, श्रीजा नायर, मनीषा मुळीक, समन्वयक पांडुरंग मुळीक पर्यवेक्षिका शोभा लवटे, समन्वयक डी. टी. पिंजारी, यांच्यासह सर्व शिक्षक आणि पालकांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.