महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पुण्यात भरणार तीन दिवसीय भारतीय छात्र संसद
नागरी सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय कार्यक्रम उपयुक्त ठरणार
नवी मुंबई : पुण्यातील कोथरुड येथील एमआयटी-वर्ल्ड पीस यूनिवर्सिटीमध्ये येत्या 10 ते 12 जानेवारी 2024 रोजी भारतीय छात्र संसद भरणार आहे. या छात्र संसदेमध्ये डॉ.विक्रम संपत, ऍड.आभा सिंग, डॉ. शेला रशीद, इम्रान प्रतापगढी, स्वामी मुकुंदानंद, एम.व्यंकय्या नायडू, खुशबू सुंदर हे मान्यवर उपस्थित राहणार असून या तीन दिवसीय छात्र संसदेमध्ये लोकशाहीबाबत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तरुणांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.
नागरी सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी हा तीन दिवसीय कार्यक्रम उपयुक्त ठरणार असुन या कार्यक्रमाच्या माध्यमातुन त्यांना समविचारी लोकांबरोबर, तज्ञांबरोबर आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील नेत्यांसोबत संवाद साधता येणार आहे. पारंपरिक शैक्षणिक पद्धतींच्या पलीकडे जाऊन परस्परसंवादी सत्र व माहितीपूर्ण चर्चासत्रे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही बाबत जागरुकता निर्माण केली जाणार आहे. विशेषत: नागरी सेवा परीक्षा व मुलाखतीसाठी तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी यातील सत्रे अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. राजकीय आणि सामाजिकदृष्टÎा सक्रिय असलेले सुमारे अडीच लाख विद्यार्थी महाविद्यालये आणि 400 पेक्षा अधिक विद्यापीठांमधून सहभागी होणार आहेत. या छात्र संसदेत सहभागी होऊ इच्छिणा-या इच्छुक विद्यार्थ्यांनी https://registration.bharatiyachhatrasansad.org या अधिकृत संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.