महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पाठीवरील दप्तराच्या ओझ्यामुळे वाकला कणा
मुलांमध्ये वाढतेय पाठदुखीची समस्या
नवी मुंबई : दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेत परतलेल्या मुलांमध्ये पाठदुखीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाठदुखी टाळण्यासाठी दप्तराचा योग्य पध्दतीने वापर करण्याची गरज आहे.
पुष्कळ लोक पाठदुखीचा संबंध प्रौढांशी जोडतात, परंतु मुलांमध्येही ही समस्या सर्रासपणे आढळून येते. पाठीवरील दप्तराचे ओझे, वर्गात किंवा घरी बसण्याची अयोग्य पध्दत आणि वारंवार फोन किंवा टॅब्लेट्सचा वापर या गोष्टी देखील तितक्याच कारणीभूत ठरतात. पहिली आणि दुसरी मधील मुलांसाठी 1.5 ते 2 किलो वजनाचा योग्य आहे, तर इयत्ता तिसरी ते पाचवी मधील मुलांनी 2 किलो आणि 3 किलो वजनाचा वापर केला पाहिजे. इयत्ता सहावी ते आठवी मधील मुलांसाठी योग्य वजन श्रेणी ही 3 ते 4 किलो इतकी आहे आणि इयत्ता नववी आणि दहावीचा मुलांसाठी 5 किलो वजन योग्य राहिल. खरं तर पाठीवर जितके वजन कमी असेल तितके चांगले राहिल अंसी प्रतिक्रिया डॉ प्रमोद भोर(ऑर्थोपेडिक्स संचालक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, फोर्टिस हॉस्पिटल, वाशी) यांनी व्यक्त केली.
दप्तराचे योग्य वजन समजून घेणे तसेच योग्य दप्तराची निवड करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. दप्तरामध्ये दुहेरी पट्ट्या असाव्यात आणि प्रत्येक खांद्यावर वजन समान रीतीने वितरीत करण्यासाठी मुलांनी दोन्ही पट्ट्यांसह दप्तर आरामात परिधान करता आले पाहिजे. हे दप्तर कमरेच्या खाली लटकू नये. पाठीच्या एका बाजूला जड दप्तर घातल्याने मुलांमध्ये मणक्यावर ताण निर्माण होतो. शरीराच्या एका बाजूला अतिरिक्त वजन टाळणे महत्वाचे आहे, कारण ती बाजू वापरताना स्नायुंवर ताण येऊ शकते असे डॉ नितीश अरोरा( बालरोग ऑर्थोपेडिक सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) यांनी स्पष्ट केले.
पालकांनी ही खात्री केली पाहिजे की त्यांच्या मुलाने त्यांचा दप्तर योग्यरित्या परिधान केले आहे. जेव्हा ते घरी असतात, तेव्हा डेस्कवर बसून किंवा फोन किंवा टॅबलेट वापरताना योग्य पध्दतीचा वापर करावा. मुलांनी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमयुक्त आहाराचे सेवन करावे तसेच पालकांनी मुलांच्या आहाराकडे खास लक्ष द्यावे. पालकांनी मुलांच्या आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर मुलांना पाठदुखीचा त्रास होत असेल तर त्यांच्या पाठीवरील ओझे किंवा शाळेत बसण्याच्या स्थितीकडे विशेष लक्ष द्यावे. योग्य जीवनशैलीचे पालन आणि शारीरिक हालचालींना प्रोत्साहन दिल्याने या वेदना प्रभावीपणे दूर होऊ शकतात आणि त्याची पुनरावृत्ती टाळता येऊ शकते असे डॉ भोर यांनी स्पष्ट केले.