नवी मुंबईत डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय योग स्पर्धा

आर्ट ऑफ लर्निंग फाऊंडेशनच्या वतीने २३ आणि २४ डिसेंबर रोजी नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेचे आयोजन

नवी मुंबई - योग प्रशिक्षणात अग्रेसर असलेल्या आर्ट ऑफ लर्निंग फाऊंडेशनच्या वतीने येत्या २३ आणि २४ डिसेंबर रोजी नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत स्थानिक स्पर्धकांसह देश-विदेशातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.

सुदृढ आरोग्यासाठी योगाचा प्रसार करण्यासाठी आर्ट ऑफ लर्निंग फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाची आंतरराष्ट्रीय योग स्पर्धा नवराष्ट्र-२०२३ या नावाने ओळखली जाणार आहे. स्पर्धेमध्ये स्थानिक स्पर्धकांबरोबर देशभरातील आणि दुबई, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्ससह अन्य देशातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना ऑनलाइन सहभाग घेता आला होता. मात्र यंदा नवी मुंबईत येऊनच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे, असे फाऊंडेशनच्या अध्यक्षा योगगुरू डॉ. रिना अग्रवाल यांनी सांगितले. या उपक्रमासाठी नवी मुंबई चॅम्पियन्स सर्व्हिस फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रताप मुदलियार यांनी विशेष सहकार्य केले आहे. स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी ८०८०२१२८५१ या क्रमांकावर संपर्वâ साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

 ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन' स्वच्छतेचा संदेश देत यशस्वी