अवनी कोळीला सिल्व्हर मेडल

अवनी कोळीला  रायगड जिल्ह्यातील पहिली डबल ट्रॅप शॉटगनची राष्ट्रीय नेमबाज होण्याचा मान

नवीन पनवेल :  66 व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धा 2023 दिल्ली येथे घेण्यात आली. या नेमबाजी स्पर्धेत सिद्धांत रायफल क्लब पनवेल, रायगडची शूटर व इंडियन मॉडेल स्कूल व जुनिअर कॉलेजची विद्यार्थिनी अवनी कोळी, मूसा काझी गोरेगाव आणि साईम देशमुख महाड ह्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. ह्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अवनी कोळी (राहणार दिघोडे) हिने डबल ट्रॅप शॉटगन नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या महाराष्ट्र टीम सिल्वर मेडलची कमाई करून नेमबाजी स्पर्धेत असणारी विख्यात नेमबाज पदवी संपादन केली आहे.

      यासाठी तिचे प्रशिक्षक रॅलस्टोन ह्यांनी भरपूर सराव करून घेऊन तिला प्रगती पथावर नेऊन ठेवले तसेच मूसा काझी व साईम देशमुख यांचे अनुक्रमे 3 व 7 गुणांच्या फरकाने विख्यात नेमबाज होण्याचे दोघांचे स्वप्न भंगले. अवनीने रायगड जिल्ह्यातील पहिली डबल ट्रॅप शॉटगनची राष्ट्रीय नेमबाज होण्याचा मान मिळविला आहे त्यासाठी तिला तिचे मार्गदर्शक /प्रशिक्षक राष्ट्रीय नेमबाज किसन खारके, अलंकार कोळी व इंडियन मॉडेल स्कूल व जुनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपॉल गौरी शाह, पराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

नवी मुंबईत डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय योग स्पर्धा