महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नवी मुंबईकर प्रकाशिका नाईकचा भारताच्या महिला क्रिकेट संघात समावेश
इंग्लंडविरोधातील टी-२० मालिकेत नवी मुंबईकर प्रकाशिका भारतीय संघातून खेळणार
नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये वाशी सेवटर १५ येथील रहिवासी असलेल्या प्रकाशिका प्रकाश नाईक हिची निवड करण्यात आली आहे. भारताच्या १९ वर्षाखालील महिलांच्या संघात खेळलेली प्रकाशिका मुंबई महिला संघाची कर्णधार म्हणून अष्टपैलु खेळ करीत आली असून अलिकडेच पार पडलेल्या अखिल भारतीय टी-२० स्पर्धेमध्ये मुंबई महिलांचा संघ विजेता ठरला आहे.
शाळेत असल्यापासून क्रिकेटपटू म्हणून नावारुपाला आलेल्या प्रकाशिकाने लेगस्पिनर गोलंदाज म्हणून आपले वेगळेपण वेळोवेळी दाखवून दिले आहे. क्षेत्ररक्षणात ती स्लिपमध्ये अत्यंत चपळाई दर्शवते तर फलंदाज म्हणून तिच्या बॅटला धावांची भूक असल्याचे क्रिकटरसिकांनी पाहिले आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मनिषा प्रकाशिकाने बाळगली आहे. भारताच्या दौऱ्यावर इंग्लंडचा संघ येत असून भारतीय संघात निवड झालेली प्रकाशिका देशाच्या संघातून इंग्लंडच्या संघाचा मुकाबला आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने २९ नोव्हेंबर, १ व ३ डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर करणार आहे.