महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी वाशी मध्ये
नवी मुंबईकरांना विज्ञान एकांकिका पाहण्याची सुसंधी
नवी मुंबई : मराठी विज्ञान परिषद आयोजित नवव्या राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी उद्या २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ५ दरम्यान वाशी सेवटर ६ येथील साहित्य मंदिर नाट्यगृह येथे पार पडणार आहे. सदर स्पर्धेकरिता प्रथम, द्वितीय व तृतीय अशी तीन पारितोषिके असून सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, नेपथ्यकार, संगीत संयोजक व प्रकाश योजनाकार अशी वैयक्तिक पारितोषिकेसुद्धा देण्यात येणार आहेत.
यावेळी शैक्षणिक आणि खुल्या गटात. व्हाय? (हिंदूस्थान अ़ँटिबायोटिक स्कूल, पुणे), चंद्रावर स्वारी (स्कूल ऑफ स्कॉलर्स, नागपूर) आणि ध्यासपर्व (प्रबोधन कुर्ला माध्य. शाळा, मुंबई). माझ्या शरीरावर माझा हक्क (आगम, पुणे), दुसरा आइन्स्टाइन (असो. ऑफ रिसर्च अ़ॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन, नागपूर आणि एरिका (नाट्यकीर्ती,मुंबई) या विज्ञान एकांकिका सदर होणार आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार असून विनामूल्य प्रवेश असलेल्या या वेगळ्या संधीचा लाभ विज्ञानप्रेमींनी घ्यावा असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेमार्फत करण्यात आले आहे.