विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व गणवेश कधी मिळणार ?

स्वराज्य पक्षाचे शिक्षण उपायुक्तांच्या दालनात ठिय्या

नवी मुंबई : नवी मुंबई मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना सहामाही परीक्षा संपली तरी देखील  शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप झाले नाही .आणि हे साहित्य  वाटप करावे म्हणून स्वराज्य पक्षाकडून पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू ठेवला होता .परंतु अधिकाऱ्यांकडून कोणतेही ठोस पाऊल उचलेले दिसून येत नाही.त्यामुळे नवी मुंबई मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ शैक्षणिक साहित्य व गणवेश मिळावा मागणी साठी  पक्षाच्या वातिने आंदोलन करत शिक्षण उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले .

 नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थीची अवस्था दयनीय झाली आहे.जगातिक स्पर्धेत टिकाव धरायचा असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. सर्वसामान्य तसेच गरीब कुटूंबाच्या पालकांना शिक्षणाचा खर्च उचलणं अवघड जातं, त्यानंतरही अनेक पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी काटकसर करून पैसा जमा करून खर्च करतात,अशावेळी गोरगरीब विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश घेणे परवडणारे नाही म्हणून पालक आपल्या पाल्याला महानगरपालिकेच्या शाळेत पाठवत असतात पण यावर्षी महानगरपालिकेने  शैक्षणिक साहित्य व गणवेश विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष संपत आले असताना देखील दिले गेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिकावे.

कसे ?आणि या भोंगळ कारभाराला  जबाबदार कोण ?असा सवाल करत हे साहित्य तात्काळ देण्यात यावे म्हणून नवी मुंबई स्वराज्य पक्षातर्फे  शिक्षण उपायुक्तांच्या दालनात आंदोलन करण्यात आले.यावेळी उपस्थित स्वराज्य पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उमेश जुनघरे , समाजसेवक मयुर धुमाळ ,सरचिटणीस योगेश पवार , उपजिल्हा अध्यक्ष सागर पावघे , शहर अध्यक्ष विनायक जाधव या सह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

काय आहेत मागण्या

१) शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप करण्यास दिरंगाई का करण्यात आली याबाबत लेखी स्पष्टीकरण देण्यात यावे . 

२) शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप दिरंगाई झाली या प्रकारची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी .

३)शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप कधी पर्यंत पूर्ण होणार याबाबत लेखी स्पष्टीकरण द्यावे.

नवी मुंबई महानगरपालिका  शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्या पैकी वह्या , बूट , बॅग हे साहित्य तीन ते चार आठवड्यात वाटप केले जाईल .त्याप्रमाणे शालेय गणवेश वाटपाची निविदा चालू असून पाच ते सहा आठवड्यात विद्यार्थ्यांना गणवेश देखील वाटप केले जाईल. - दत्तात्रय घनवट, शिक्षण उपायुक्त,नवी मुंबई महानगर पालिका.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

कै. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेने पटकाविला