मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डींग स्पर्धेत सुभाष पुजारी यांना गोल्ड मेडल  

महाराष्ट्र पोलीस दलासह देशाचे उंचावले नाव

नवी मुंबई : साऊथ कोरिया देशामध्ये आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या वर्ल्ड बॉडी बिल्डींग स्पर्धेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी गोल्ड मेडल पटकावून महाराष्ट्र पोलीस दलासह देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे पुजारी यांचे पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी, त्यांचे सहकारी मित्र सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.  

साऊथ कोरिया येथे ६ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड बॉडी बिल्डींग स्पर्धा'साठी ‘इंडियन बॉडी बिल्डींग ॲन्ड फेडरेशन'च्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांची भारतीय संघातून निवड करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ४१ देशातील संघांनी आणि ४५० खेळाडुंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत पुजारी यांनी ८० किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले.

एपीआय सुभाष पुजारी या स्पर्धेसाठी दररोज सहा सराव करीत होते. सुभाष पुजारी यांनी आतापर्यंत ८ इंटरनॅशनल मेडल मिळवलेले आहेत. सुभाष पुजारी यांचे पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी तसेच मित्र सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

अवनी कोळीला सिल्व्हर मेडल