जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उदंड सहभाग
इंदिरानगर सेवा वस्तीतील अभ्यासिकेला भेट
विवेकानंद संकुलच्या विद्यार्थ्यांची दिवाळी केली गोड
नवी मुंबई : प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा यांच्या वतीने दिवाळीनिमित्त तुर्भे - इंदिरानगर येथील आप्पा जोशी प्रतिष्ठान अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अभ्यासिकेला ८ नोव्हेंबर रोजी भेट देण्यात आली. सामाजिक बांधिलकीचे भान जपत गेल्या तीन वर्षापासून विवेकानंद विद्यालय, सानपाडा यांच्या वतीने सेवा वस्तीमध्ये जाऊन दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम केला जातो.
इंदिरा नगर सेवा अवस्थेतील विद्यार्थ्यांसमवेत गाणी गोष्टी गप्पा इत्यादी कार्यक्रम घेतले. विद्यार्थ्यांना शाळेमार्फत दिवाळी खाऊचे आणि आकाश कंदीलाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आपल्यासोबत आपल्या समाजबांधवांची दिवाळी आनंदात सुखात जावी, त्यासाठी आपल्या परीने फुल ना फुलाची पाकळी म्हणून शाळेतील शिक्षक स्वतः निधी संकलन करून अशा प्रकारचा कार्यक्रम करत असतात. या कार्यक्रमांमध्ये तीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी खाऊचे वाटप करण्यात आले.