जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उदंड सहभाग
माझी वसुंधरा अंतर्गत महापालिका तर्फे जनजागृती
न्यू हॉरीझन पब्लिक स्कूल मध्ये हवामान बदलाविषयी कार्यक्रम संपन्न
पनवेल : आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने न्यू हॉरीझन पब्लिक स्कूल मध्ये हवामान बदलाविषयीचा जनजागृती कार्यक्रम ४ नोव्हेंबर रोजी घेण्यात आला.
दिवसेंदिवस हवामान बदलामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहेत. या दुष्परिणामाबद्दलची माहिती शालेय विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने पर्यावरण विभाग उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सुचनेनूसार माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत न्यू हॉरीझन पब्लिक स्कूल मध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी वृक्षारोपणाचे महत्व, पर्यावरणपूरक उत्सव, ऊर्जेची बचत, हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठीच्या उपाय योजना याविषयी माहिती देण्यात आली. याबरोबरच प्लास्टिकची हानिकारकारता याची देखील माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसे यावेळी ‘माझी वसुंधरा'ची शपथ घेण्यात आली.
याप्रसंगी स्कूलच्या प्राचार्या अमिता दत्ता, उपप्राचार्या पुष्पा मेमन, प्राथमिक शाळेच्या उपप्राचार्या सुपर्णा चट्टोपाध्याय, कला विभाग प्रमुख सुप्रिया कुंभार तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.