शिक्षक, पदवीधारकांनी मतदार नाव नोंदणी त्वरित करण्याचे आवाहन

मुंबई शिक्षक, मुंबई, कोकण पदवीधर मतदार संघातील मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा - डॉ. कल्याणकर

नवी मुंबई : मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार होऊ इच्छिणाऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात पदवीधारकांनी नोंदणी त्वरीत करावी, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

 ‘भारत निवडणूक आयोग'कडून ३० सप्टेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या घोषित कार्यक्रमानुसार मुंबई  पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची टप्प्याटप्याने नव्याने मतदारयादी तयार करण्यात येणार आहे.

‘भारत निवडणूक आयोग'च्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यमक्रमा नुसार २५ ऑक्टोबर २०२३ रोजी मतदार नोंदणी अधिनियम १९६० नुसार वर्तमानपत्रात दिलेल्या नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी करण्यात येणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी नमुना-१८ किंवा नमुना-१९ द्वारे दावे-हरकती  स्विकारणाचा अंतिम दिवस असेल. २० नोव्हेंबर रोजी हस्तलिखिते तयार करणे आणि प्रारुप मतदार याद्यांची छपाई करण्यात येईल.२३ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येईल. २३ नोव्हेंबर ते  डिसेंबर या कालावधीत दावे-हरकती स्विकारली जातील. २५ डिसेंबर रोजी दावे-हरकती निकाली  काढण्यात येतील तसेच पुरवणी यादी तयार करुन छपाई करण्यात येईल. ३० डिसेंबर २०२३ रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्यात येईल.

शिक्षक मतदार संघ...
शिक्षक मतदार संघाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये ज्या व्यक्तिींची नावे समाविष्ट आहेत, अशा सर्व व्यक्तींना सुध्दा नवीन यादी तयार करताना विहीत नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.शिक्षक मतदार संघाच्या अर्हतेसाठी जी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि त्या मतदारसंघाची सर्वसाधारणपणे रहिवासी आहे तसेच जिने दिनांक १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी लगतच्या सहा वर्षांमध्ये राज्यातील एखाद्या माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान तीन वर्ष अध्यापनाचे काम केले आहे, अशी व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केले जाण्यास पात्र राहील. तसेच शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी सादर केलेल्या नमुना १९ मधील अर्जासोबत संबंधित व्यक्तीने १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी लगतच्या सहा वर्षांमध्ये एखाद्या माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान तीन वर्ष अध्यापनाचे काम केले असल्याबाबत शैक्षणिक संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

पदवीधर मतदार संघ...
पदवीधर मतदार संघाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये ज्या व्यक्तिींची नावे समाविष्ट आहेत. अशा सर्व व्यक्तींना सुध्दा नवीन यादी तयार करताना विहीत नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. पदवीधर मतदार संघाच्या अर्हतेसाठी जी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि त्या मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी आहे तसेच ती १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी किमान ३ वर्षे भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे. ३ वर्षाचा कालावधी ज्या दिनांकास अर्हता पदवी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असेल आणि ते विद्यापीठ किंवा अन्य संबंधीत प्राधीकरण यांच्याकडून प्रसिध्द करण्यात आला असेल त्या दिनांकापासून मोजण्यात येईल. नमुना १८ मधील अर्जासोबत पदवीशी समतुल्य म्हणून निर्दिष्ट करण्यात आलेली अर्हता (एजम्ग्गि्‌ ैंल्ीत्ग्ग्मि्ीूग्दहे) या पुरावा स्वसाक्षांकीत केलेला आणि अतिरिक्त पदनिर्देशीत अधिकाऱ्यांनी अधिप्रमाणीत करुन जोडणे आवश्यक आहे. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शेतकरी शिक्षण संस्था संचालित घणसोलीच्या शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा