शेतकरी शिक्षण संस्था संचालित घणसोलीच्या शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा

वाचन प्रेरणा दिनी विद्यार्थ्यांना समजावले ग्रंथालयांचे महत्व

नवी मुंबई : घणसोलीतील शेतकरी शिक्षण संस्था संचालित इंग्रजी माध्यम विद्यालयात अलिकडेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिनी वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. मोबाईल, इंटरनेटमुळे युवा पिढीचे वाचन कमी झाल्याचे लक्षात घेऊन शाळा प्रशासनाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात वाचाल तर वाचाल उक्तीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. सकाळी दीप प्रज्वलनासह पुस्तक पूजन  करून उपक्रमाची सुरवात करण्यात आली. वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत विषद करण्यात आले. ग्रंथालयात सर्वांना क्रमाक्रमाने आणून तेथील कामकाज समजावून सांगण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांकडून वाचन करवून घेण्यात आले.

यानिमित्त वाचनाचे महत्व या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांचे वक्तृत्व उत्तम होण्यासाठी हाच विषय देत विद्यार्थ्यांनी भाषणे  केली. ग्रंथालय भेटीत विद्यर्थ्यांना कुठला विषयात रस आहे, कुठली पुस्तके वाचली पाहिजेत, रोजची वर्तमान पत्रे, कथा कादंबरी,  वाचल्याने कसा आत्मविश्वास येतो,  ज्ञानात कशी भर पडते, असे वाचन भविष्यात कसे कामी येते अशा विविध विषयावर मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांनाही बोलते केले गेले. सदर उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डी.बी.म्हात्रे, सेक्रेटरी पी. के.म्हात्रे, खजिनदार प्रभाकर पाटील व सुविध म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ.वैशाली पाटील व माध्यमिक विभाग सौ. सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वी पार पडला.यासाठी ग्रंथपाल सौ. स्वाती हंप्रस यांनी विशेष मेहनत घेतली. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

‘वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प स्वयं अध्ययन परीक्षा'चा बक्षीस वितरण समारंभ संपन्न