महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने सेंट जोसेफ शाळेमध्ये पोस्टर स्पर्धा

सेंट जोसेफ स्कूल नवीन पनवेल मध्ये माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत पोस्टर मेकिंग स्पर्धा

पनवेल : आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. आज दिनांक  18 ऑक्टोबर रोजी  नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ स्कूल मध्ये माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवरती पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली.

महापालिकेच्यावतीने पर्यावरणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.  याचाच एक भाग म्हणून उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सूचनेप्रमाणे पर्यावरणपूरक सणांचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे यादृष्टीकोनातून  नवीन पनवेल मधील सेंट जोसेफ स्कूलमध्ये फटाके बंदी व पर्यावरणपूरक  दिवाळी ह्या विषयावरती पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. 

इयत्ता 5 वी ते 7 वी  आणि 8 वी ते 10 अशा दोन गटात झालेल्या यास्पर्धेत सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. यानंतर पालिका क्षेत्रातील आणखीन चार शाळेमध्ये पर्यावरणविषयक स्पर्धा घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण ,विद्यालयाचे मुख्याध्यापक फरझाना तुंगेकर आणि चित्रकला विषयाचे शिक्षक  सचिन काटकर यांचे सहकार्य लाभले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 शिक्षक, पदवीधारकांनी मतदार नाव नोंदणी त्वरित करण्याचे आवाहन