जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत मॉडर्न स्कूलची बाजी


मॉडर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांची विविध क्रीडा प्रकारात यशाला गवसणी

वाशी : राज्य क्रीडा-युवक सेवा संचालनालय अंतर्गत ठाणे जिल्हा क्रीडा परिषद आणि नवी मुंबई महापालिका तर्फे नुकत्याच मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत ‘रयत शिक्षण संस्था'च्या वाशी येथील मॉडर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत यशाला गवसणी घातली आहे.

वुशू खेळामध्ये १९ वर्षाखालील वयोगटात मुलींमध्ये योगिता गजानन शिंदे (इयत्ता अकरावी) हिने ६० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, मुलांमध्ये करण विजय शिंदे (अकरावी) याने ५६ किलो वजनी गटात आणि दर्शन राहुल पानसरे (अकरावी) याने ५२ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला. भालाफेक मध्ये १७ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात मयंक संतोष घाग (दहावी) याने प्रथम, तर गोळाफेकमध्ये १४ वर्षाखालील मुलांमध्ये सुमित सुनील सिंग (आठवी) तृतीय क्रमांक प्राप्त केला. धावण्याच्या शर्यतीत १४ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात श्रावणी राजू चिंचोलकर (आठवी) ४०० मी. तृतीय क्रमांक, स्वरा महेश कदम (आठवी) १०० मी. धावणे तृतीय, तर रिले प्रकारात स्वर महेश कदम, श्रावणी राजू चिंचोलकर, भूमी विजय चौधरी, राजनंदिनी दिलीप पाटील, आएशा गणेश लोखंडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.


सर्व विजयी स्पर्धकांचे विद्यालयाच्या प्राचार्य सुमित्रा भोसले यांनी अभिनंदन करुन त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मराठी माध्यमाचे पर्यवेक्षक आबासाहेब वाघ, इंग्रजी माध्यमाच्या पर्यवेक्षिका मनिषा संकपाळ, हना सरेला, क्रीडा शिक्षक प्राजक्ता वारोसे, मच्छिंद्र पाटील, आदित्य कांबळे उपस्थित होते. 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

 मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डींग स्पर्धेत सुभाष पुजारी यांना गोल्ड मेडल