पनवेल महानगरपालिका शाळांचा क्षेत्र भेट उपक्रम

पनवेल महानगरपालिका शाळांचा 14 ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी क्षेत्रभेटीचा उपक्रम

पनवेल : आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. नुकताच महानगरपालिका शाळांनी शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी क्षेत्रभेटीचा उपक्रम राबविला.

या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील विविध महत्त्वाच्या विभागांचा परिचय करून देऊन, तेथे चालणाऱ्या कामाची माहिती करून देण्यात आली. शाळेच्या भिंती बाहेरचा एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना मिळवून देणे हा उद्देश या मागे होता.

तसेच शाळा क्रमांक आठ पोदी शाळा यांनी नक्षत्र रोपवाटिकेला भेट दिली.विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात रममाण होण्याचा क्षण अनुभवला. यावेळी रोपवाटिकेतील निरनिराळी फुले व झाडांविषयी संबंधितांकडून माहिती घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. 

पनवेल महानगरपालिका शाळा क्रमांक पाच मोठा खांदा, दि.बा पाटील शाळा क्रमांक एक, सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठ पोदी या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी सदर उपक्रम उत्साहाने राबविला. शाळा क्रमांक पाचच्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खांदा कॉलनी येथील ब्लड बँक, खांदेश्वर उद्यान, खांदेश्वर पोलीस ठाणे या ठिकाणी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस विभागाच्या जबाबदाऱ्या, त्यांचे काम समजून घेतले. 

तसेच शाळा क्रमांक आठ पोदी शाळा यांनी नक्षत्र रोपवाटिकेला भेट दिली.विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात रममाण होण्याचा क्षण अनुभवला. यावेळी रोपवाटिकेतील निरनिराळी फुले व झाडांविषयी संबंधितांकडून माहिती घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. पनवेल पालिकेच्या सर्व शाळांमध्ये क्षेत्रभेट हा उपक्रम घेतला जात आहे. 

अतिरिक्त आयुक्त माननीय भारत राठोड आणि प्रशासन अधिकारी कीर्ती महाजन यांच्या सूचनेनुसार पनवेल पालिकेच्या सर्व शाळांमध्ये क्षेत्रभेट हा उपक्रम घेतला जात आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 वाचन प्रेरणा दिनी ‘अग्निपंख'चे अभिवाचन