पोलीस नाईक शर्मिला नाईक यांची वर्ल्ड कॉम्बॅट स्पर्धेसाठी निवड

नवी मुंबई पोलीस दलातर्फे नाईक यांना शुभेच्छा

 नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱया पोलीस नाईक शर्मिला सीतामणी नाईक यांची `आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी'च्या मान्यतेने सौदी येथे होत असलेल्या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. पॅपोशन या खेळासाठी शर्मिला नाईक भारत देशाचे नेतॅत्व करणार आहे.  

पॅपोशन खेळ `आंतरराष्ट्रीय पुस्ती संघटना'च्या मान्यतेने खेळला जातो. पुस्ती आणि ज्युडो या खेळाचे संमिश्रण असलेला पॅपोशन खेळ जगभरात खेळला जातो. पॅपोशन या खेळाला आंतरराष्ट्रीय पुस्ती संघटना आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटी या दोन्हींची मान्यता आहे.

सौदी येथे होत असलेल्या वर्ल्ड कॉम्बॅट या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑलिम्पिक कोटा मिळवावा लागतो. रशिया येथे झालेल्या बेस्ट ऑफ फाईक्ह असे नामांकन मिळवून शर्मिला नाईक यांनी ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. यामुळे त्यांची  21 ते 30 ऑक्टोबर दरम्यान सौदी येथे होत असलेल्या वर्ल्ड कॉम्बॅट स्पर्धा-2023 साठी निवड झाली आहे.
शर्मिला नाईक यांना `ट्रडिशनल रेसलिंग फेडरेशन इंडिया'चे अध्यक्ष सीए तांबोळी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच नाईक यांना यु.डब्ल्यू.डब्ल्यू. बेल्ट रेसलिंग आशियाई सचिव उमर मुक्तार तांबोळी यांचे देखील मार्गदर्शन लाभले.

मागील 4-5 वर्षापासून शर्मिला नाईक यांनी मास रेसलिंग आणि बेल्ट रेसलिंगच्या सरावाला सुरुवात केली आहे. त्यानंतर त्यांनी युरोपातील बापु अझरबैजान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट आणि मास रेसलिग चॅम्पियनशिप मध्ये सहभागी होऊन उसबेकिस्तान, अझरबैजान, पाकिस्तान, किर्गिस्तान, तुर्पमेनिस्तान अशा विविध देशातील स्पर्धकांशी स्पर्धा करत दोन रौफ्य आणि एक कांस्य पदक मिळवून नवी मुंबईचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. युरोपातील बापु अझरबैजान येथील युवा-ाढाrडा मंत्रालय जागतिक ऍथेनो स्पोर्टस् कॉन्फिडरेशन अझरबैजान प्रजासत्ताकच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय महोत्सव स्पर्धेतील कल्चरल प्रकारात शर्मिला नाईक यांनी भारतीय संघाला 2 रौफ्य पदक प्राफ्त करुन दिले आहे. त्यानंतर 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2022 दरम्यान बापु अझरबैजान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट आणि मास रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये शर्मिला नाईक यांनी आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग या प्रकारात 1 कांस्यपदक आणि मास रेसलिंग या प्रकारात 2 रौप्य पदक मिळवून दिले आहे. यापूर्वी शर्मिला नाईक यानी विविध स्पर्धांमध्ये 8 सुवर्णपदक, 2 रौप्य आणि 13 कांस्य पदकाची कामगिरी केली आहे.  

दरम्यान, पोलीस दलातील आपले काम सांभाळून शर्मिला नाईक यांनी आपल्या खेळाचा छंद जोपासला आहे. या खेळाच्या र्सावासाठी त्या नियमित वेळ काढत असतात. शर्मिला नाईक या विविध स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन नवी मुंबई पोलीस दलाचे नाव उंचावत असल्याने नवी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांकडून देखील त्यांना नेहमीच सहकार्य लाभत असते. 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

 जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत मॉडर्न स्कूलची बाजी