विवेक वारभुवन आंतरविद्यापीठीय वक्तृत्व स्पर्धेत पहिला

भारतीय परराष्ट्र धोरण वास्तव आणि अपेक्षा विषयावरील ववतृत्व स्पर्धेत विवेक वारभुवन प्रथम

नवी मुंबई : सावित्रीबाई फुले विद्यापीठ-पुणे येथे १० ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या माजी राज्यपाल आणि कुलपती पी. सी. अलेक्झांडर आंतरविद्यापीठीय वक्तृत्व स्पर्धेत नवी मुंबईतील विवेक वारभुवन याने मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने करताना भारतीय परराष्ट्र धोरण वास्तव आणि अपेक्षा या ऐनवेळी दिलेल्या विषयावर विवेकने प्रभावी मांडणी करून प्रथम क्रमांक पटकावला व मुंबई विद्यापीठाला बहुमान मिळवून दिला.

महाराष्ट्रातील १० विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. मनोहर जाधव, डॉ. सदानंद भोसले  तसेच शिवाजी  विद्यापीठाचे  डॉ. अलोक जत्राटकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.  मा. राज्यपाल व कुलगुरू यांच्या हस्ते विवेक वारभुवन यास सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

‘वाचन प्रेरणा दिन' निमित्त ठाणे महापालिका तर्फे ‘चला वाचूया' उपक्रम