महापालिका शाळांमध्ये दप्तरविना शाळा उपक्रम

पनवेल महापालिका शाळांमध्ये विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन

पनवेल : महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका शाळांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यानुसार ७ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या शाळा क्र. १ ते ११ या शाळांमध्ये ‘दप्तरविना शाळा' उपक्रम राबविण्यात आला.

दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आणि चौथ्या शनिवारी महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम घेतला जातो. या उपक्रमाची सुरुवात सुंदर परिपाठाने केली जाते. या उपक्रमानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळतो. न घाबरता बिनधास्तपणे सर्व विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत असतात.

या उपक्रमांतर्गत विविध खेळ जसे की बुध्दीबळ, कॅरम, कवायत, योगासने, संगितखुर्ची, तळ्यात मळ्यात घेतले जातात. तसेच डिजीटल बोर्डवर विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या उपयोगी असणारे चित्रपट दाखविण्यात आले. याबरोबरच गायन, नृत्य नाट्य, वादविवाद यासाठी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात. त्यामुळे विद्यार्थ्याच्या कविता, पाढे पाठ होतातच; पण ते निडरपणेपुढे येऊन सादरीकरणातून त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त भारत राठोड आणि प्रशासन अधिकारी किर्ती महाजन यांच्या सुचनेनुसार महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ‘दप्तर विना शाळा उपक्रम' घेतला जात आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

विवेक वारभुवन आंतरविद्यापीठीय वक्तृत्व स्पर्धेत पहिला