द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स तर्फे अभीयंता दिन साजरा


विद्यार्थी, संशोधक, अभियंते यांना एक्सलन्स अवॉर्डस्‌ प्रदान

नवी मुंबई : ५६ व्या अभियंता दिनानिमित्त द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स (इंडिया) नवी मुंबई लोकल सेंटर (एनएमएलसी) आणि इी. सी. रॉड्रिग्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वाशी (एफ.सी.आर.आय.टी.) यांनी संयुक्तपणे एक्सलन्स अवॉर्डस्‌-२०२३'चे आयोजन करण्यात आले होते. अभियंता दिनानिमित्त विद्यार्थी, संशोधक आणि अभियंते यांच्या उत्कृष्टतेबद्दल आणि त्यांचा गौरव करण्यासाठी सदर पुरस्कार वितरीत करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याचे प्राथमिक उद्दिष्ट शैक्षणिक आणि उद्योग व्यावसायिकांच्या उत्कृष्ट योगदानाला ओळखणे आणि त्यांचा सन्मान करणे होते. १५ सप्टेंबर रोजी सदर कार्यक्रम वाशीतील साहित्य मंडळ सभागृह येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबई महापालिका आयुवत राजेश नार्वेकर, द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स नवी मुंबई लोकल सेंटरचे अध्यक्ष डॉ. के. एम. गोडबोले, एफ.सी.आर.आय.टी.चे प्राचार्य डॉ. एस. एम. खोत, ‘एनएमएलसी'चे माजी अध्यक्ष केशव वरखेडकर, महाराष्ट्र केंद्र आणि नवी मुंबई सेंटरचे माजी अध्यक्ष डॉ. मोहन डगांवकर, ‘एनएमएलसी'चे सरचिटणीस संजय बागुल, पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. निलज देशमुख यांच्यासह ‘एनएमएलसी' केंद्राचे माजी अध्यक्ष, सचिव यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

नवी मुंबईची उभारणी अनेक दशकांपासून प्रख्यात अभियंत्यांनी केली आहे, त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. एनएमएलसी आणि एफ.सी.आर.आय.टी. सर्व क्षेत्रांतील शिक्षणतज्ञ आणि उद्योगांनी केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ओळखण्यात नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, असे महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांनी सांगितले. तसेच  अभियंता दिनानिमित्त मी सर्व दूरदर्शी अभियंत्यांचे कार्य तसेच विकास आणि तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करतो, असेही नार्वेकर यावेळी म्हणाले.
आम्हाला असे सत्य कबूल करताना अभिमान वाटतो की २०१९, २०२१, २०२२ मध्ये आयोजित केलेल्या ‘एनएमएलसी' आणि एफ.सी.आर.आय.टी. उत्कृष्टता पुरस्कारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ते खूप यशस्वी झाले. मी त्या प्रत्येक अभियंत्याचे अभिनंदन करतो. पुरस्कार विजेत्या आणि परीक्षकांचेही धन्यवाद मानतो, असे ‘एनएमएलसी'चे सरचिटणीस संजय बागुल यांनी नमूद केले.

सदर कार्यक्रमात शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार (फॅकल्टी-नॅशनल) मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जयपूर येथील डॉ. मख्खन लाल मीना यांना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक उत्कृष्टता (फॅकल्टी प्रादेशिक) फा. सी. रॉड्रिग्ज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉ. सुशील थळे यांना देण्यात आला.

शैक्षणिक उत्कृष्टता असिस्टंट इंजिनिअर पुरस्कार (विभाग प्रमुख-नॅशनल) फा. सी. रॉड्रिग्ज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉ. बिंदू एस. यांना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक उत्कृष्टता (संस्था-प्रादेशिक) पुरस्कारासाठी ए. पी. शाह इन्स्टिट्युट ऑफ टेवनॉलॉजीची निवड प्रदान करण्यात आली. शैक्षणिक उत्कृष्टता (प्राचार्य-प्रादेशिक) डी.वाय.पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, कोल्हापूरचे डॉ. संतोष देविदासपंत चेडे यांना प्रदान करण्यात आला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी डॉ. कौशिक पाल यांना संशोधन उत्कृष्टता (फॅकल्टी-नॅशनल) प्रदान करण्यात आली. कोल्हापूरच्या डॉ. शिवलिंग महालिंग पिसे केआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला संशोधन उत्कृष्टता (फॅकल्टी-प्रादेशिक) प्रदान करण्यात आली. मन्मथ कुमार बी. राजा रामण्णा सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, इंदूर यांना संशोधन उत्कृष्टता (उद्योग-राष्ट्रीय) प्रदान करण्यात आले. रमेश जाधव ॲडिव्हरिटास इन्स्पेक्शन्स प्रा.लि. यांना उद्योग उत्कृष्टता प्रदान करण्यात आली. लि. स्टार्टअप उत्कृष्टतेचा पुरस्कार देबदत्त मिश्रा एरिशा स्पेस प्रा. लि. यांना देण्यात आला. अश्विन उपमन्यू देव, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास यांना शैक्षणिक उत्कृष्टता (युजी-नॅशनल) प्रदान करण्यात आली. शबनम एस कुमारगुरु कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, कोईम्बतूर यांना शैक्षणिक उत्कृष्टता (युजी-नॅशनल) प्रदान करण्यात आली. तर १७ दूरदर्शी अभियंत्यांना विशेष ओळख पुरस्कार देण्यात आले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद'मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांची लक्षणीय कामगिरी