मनपा शाळा क्रमांक पाचमध्ये यशाची हंडी ज्ञानाची थर या अभिनवपूर्ण उपक्रमाचे आयोजन

जीवन शिक्षण विद्यामंदिर पनवेल मनपा शाळेत यशाची हंडी ज्ञानाची थर या अभिनवपूर्ण उपक्रमाचे आयोजन

पनवेल : दहीकाला उत्सवाचे निमित्त साधून यशाची हंडी ज्ञानाची थर या अभिनवपूर्ण उपक्रमाचे आयोजन आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी जीवन शिक्षण विद्यामंदिर पनवेल मनपा शाळा क्रमांक पाच येथे करण्यात आले होते.

शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी कीर्ती महाजन यांच्या सूचनेप्रमाणे माननीय मुख्याध्यापिका शुभ आव्हाड यांनी सर्व शिक्षकांच्या मदतीने सदर उपक्रम गावकऱ्यांच्या मदतीने मोठ्या उत्साहात पार पाडला. प्रत्येक सण आपल्याला काही बोधात्मक गोष्टींची जाणीव करून देत असतो. ज्याप्रमाणे दहीकाला उत्सवात गोविंदाचे थर लावून गोविंदा  दहीहंडी फोडतो. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्ञानाचे थर लावून यशाची हंडी म्हणजेच फलस्वरूपात डॉक्टर वकील आयएएस आयपीएस असे अनेक क्षेत्रांमध्ये पुढे जाऊन यशाची हंडी प्राप्त करावी असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. उपक्रमशील शिक्षक  ज्ञानेश रामचंद्र आलदर यांनी  विशेष सहकार्य करून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश समर्थपणे पोहचवला.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शिक्षक दिनानिमित्त महापालिकेची विद्यार्थ्यांना भेट