उरण तालुक्यातील बळीराम पाटील यांची  शिक्षक पुरस्कारासाठी निवड 

बळीराम जनार्दन पाटील यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

उरण : ग्रामविकास विभागाच्या मंजुरीनंतर रायगड जिल्हा परिषदेने २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षातील १५ तालुक्यातील प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या १६ शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये उरण तालुक्यातील बळीराम जनार्दन पाटील यांचा समावेश आहे.

    बळीराम पाटील हे मागील २५ वर्षांपासून राजिपच्या विविध शाळेत विद्यादानाचे काम करीत आहेत. सध्या ते चिरनेरच्या राजिप शाळेत उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या शैक्षणिक कामाची दखल घेऊन त्याची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.बळीराम ठाकूर हे विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील कंठवली गावातील रहिवासी असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.त्यांच्या निवडीबद्दल राजिप बरोबरच निकटवर्तीयांकडूनही शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

मनपा शाळा क्रमांक पाचमध्ये यशाची हंडी ज्ञानाची थर या अभिनवपूर्ण उपक्रमाचे आयोजन